Take a fresh look at your lifestyle.

जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकार सकारात्मक असून नागरिकांच्या हितासाठी आंदोलन मागे घ्यावे- आ. समाधान आवताडे

जुन्या पेन्शन साठी सुरू असलेल्या आंदोलनाला आ.आवताडे यांचा पाठिंबा

555

- Advertisement -

मंगळवेढा  प्रतिनिधी
सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना व इतर प्रश्न सोडवणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस  यांच्याकडे तसेच  चालू  अधिवेशनात हे प्रश्न सभागृहात उपस्थित करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार समाधान आवताडे यांनी दिली असून  सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा,मार्च एंड ची लगबग व व्हायरल इन्फेक्शन ही परिस्थिती पाहता कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन देखील आमदार समाधान दादा अवताडे यांनी केले.
            मंगळवेढा येथे संपकरी कर्मचाऱ्यांच्या आंदोलना ला भेट दिली व त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आपली भूमिका जाहीर केली.सध्या राज्यात जुन्या पेन्शन योजनेसाठी सर्वत्र सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली असून गेल्या चार दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे. मंगळवेढा तालुक्यात गेल्या चार दिवसापासून येथील पंचायत समिती कार्यालयासमोर सर्व खात्याचे सरकारी कर्मचारी, अधिकारी, शिक्षक यांनी जुनी पेन्शन मिळावी यासाठी आंदोलन सुरू केले आहे. सरकारने योजना लागू करावी तरच आंदोलन मागे घेतले जाईल अशी टोकाची भूमिका घेतली आहे. आज दिनांक 18 रोजी आमदार समाधान आवताडे यांनी येथील पंचायत समितीच्या आवारात सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.

              तसेच संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून  त्यांच्याकडे याबाबत चर्चा करू तसेच सरकारी कर्मचारी यांच्या विविध प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठवून कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेणार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी आमदार आवताडे यांनी सध्या कर्मचाऱ्यांचा संपामुळे सर्व सेवा विस्कळीत झाले आहेत त्याचा परिणाम सर्वसामान्य माणसावर होत असून विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू असून त्यांना अडचण होवू नये,मार्च एंड  जवळ आल्याने अधिकारी व कर्मचारी नसल्याने निधी खर्च होणार नसल्याने विकास कामे रखडली जाणार आहेत. तसेच नव्याने होत असलेले व्हायरल इन्फेक्शन यामुळे रुग्ण संख्या वाढू शकते त्यामुळे  कर्मचाऱ्यांनी या बाबी लक्षात घेता संप मागे घ्यावा असे आवाहन देखील आ.अवताडे यांनी यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना  केले.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More