Take a fresh look at your lifestyle.

भाजपा लागले प्रचाराला मात्र विरोधी पक्षांचा घोळ मिटेना

दिनांक 27 रोजी चित्र स्पष्ट होणार

417

- Advertisement -

                         

                   मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस तीर्थक्षेत्र विकास आघाडी शिवसेना यांनी कंबर कसली असून भाजपाकडून गट व गणनिहाय उमेदवारा फिक्स झाले असून त्या दृष्टीने आमदार समाधान आवताडे यांनी पगाव निहाय प्रचार  दौरे सुरू केले आहेत. परंतु विरोधी गटाकडून अद्यापही उमेदवार निश्चिती झाली नसल्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार  याचा सस्पेन्स असून आज दिनांक 27 रोजी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी कळणार आहे तसेच भाजपविरोधात सगळे एकत्र येतात की विभागून लढतात याबाबत मतदारामधून  तर्क वितर्क  लढवले जात आहेत.

               मंगळवेढा तालुक्यात चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती गणासाठी निवडणूक होत आहे गेल्या नऊ वर्षांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती वर आमदार समाधान आवताडे व त्यांचे चुलते ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे यांचे वर्चस्व होते त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागा मिळाल्या होत्या. परंतु गेल्या चार वर्षा पासून निवडणुकाच न झाल्यामुळे कार्यकर्त्यांना निवडणुका लढविता आल्या नाहीत. सध्या निवडणुका लागल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोचला असून जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी 157 जन सध्या रिंगणात  होते.त्यातील चौघांनी माघार घेतली आहे. देशात राज्यात भाजपाची सत्ता असल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीवर देखील भाजपाची सत्ता यावी यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी नियोजन केले असून त्यांनी विरोधी पक्षांच्या अगोदर गट व गणनिहाय उमेदवारांची निश्चिती केली असून त्या दृष्टीने त्यांनी गाव निहाय प्रचार सभा चालू केल्या आहेत. त्यांनी उमेदवार निश्चिती व प्रचार सभा यामध्ये इतर पक्षांच्या तुलनेत आघाडी घेतली असली तरी विरोधी पक्षाकडून मात्र अद्यापही खलबते सुरू आहेत. नगरपालिका निवडणुकीत येथील ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे,भगीरथ भालके, त्यांच्यासह सर्वपक्षीय एकत्रित येऊन भाजपाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पाडत नगराध्यक्षासह 10 जागा मिळवल्या. परंतु या निवडणुकीनंतर या विरोधी गटांमध्ये अंतर्गत काहीशा कुरबुरी झाल्यामुळे  त्यांच्यात काही वाद निर्माण झाला होता.अर्ज माघारी घेण्याचा दिवसा उजाडला तरी अद्यापही ते एकत्रित न आल्यामुळे ते निवडणुकीत एकत्र येतात की वेगळे लढतात याबाबत संभ्रम आहे. तसेच यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना व तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांनी स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. भाजपविरोधात सर्व पक्ष येणार असल्याची चर्चा केली जात असली तरी भाजपाबरोबर ही विरोधी गटातील एक गट जाणार असल्याची चर्चा असून विरोधी गटाची नेमकी भूमिका काय राहणार याबाबत संभ्रम आहे.

             विरोधी गटाचे अद्यापही कसे लढायचे याबाबत एकमत झाले नसले तरी भाजपा मात्र कोण बरोबर येईल किंवा नाही याचा विचार न करता त्यांनी पहिल्यापासून जिल्हा परिषदेच्या चार व पंचायत समितीच्या 8 जागा लढविण्याच्या दृष्टीने नियोजन करीत उमेदवार फिक्स करीत प्रचार चालू केला आहे. भाजपविरोधात  सर्वच पक्षांनी स्वबळाची भाषा केली असून जर सर्व पक्षीय एकत्रित येऊन निवडणुका लढविल्यास विरोधकांना काही जागावर यश मिळू शकते अन्यथा पराभवाला  सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत  आहे. भाजपाकडून काही जागा बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यास यश येणार की नाही हे दिनाक 27 रोजी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी कळणार आहे. भाजपकडून आ.समाधान आवताडे तर विरोधी गटाकडून लढण्यासाठी  भगीरथ भालके  माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे जेष्ठ नेते बबनराव आवताडे, दामाजीचे संचालक सिद्धेश्वर आवताडे,काँग्रेसचेॲड रविकिरण  कोळेकर तालुका अध्यक्ष प्रशांत साळे,शिवसेना तालुका अध्यक्ष आबा लांडे हे निवडणुकीची सूत्रे हाताळत आहेत . अडचणीच्या ठरणाऱ्या उमेदवारांचे  अर्ज माघारी घेण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहेत.दिनाक 27 ही अंतिम मुदत असून येथील राजकीय हालचाली वेगवान झाल्या असून अनेक मध्यस्त एकमेकांना संपर्क साधून पर्याय सुचवत आहेत.नेमक्या लढती कशा राहणार याबाबतचे चित्र  दिनाक 27 रोजी  दुपारी 3 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More