Take a fresh look at your lifestyle.

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणी आंदोलनाला सिद्धेश्वर आवताडे, भगीरथ भालके यांनी दिला पाठिंबा

265

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी

         सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी दामाजीचे संचालक सिद्धेश्वर आवताडे, विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी मंगळवेढा येथील पंचायत समिती आवारात मोर्चात सहभागी होऊन संपकऱ्यांना पाठिंबा दिला व सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी सदैव पाठीशी राहून मदत करण्याची ग्वाही यावेळी दिली.

           जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीवरून मंगळवेढ्यात सर्व कार्यालयातील कर्मचारी व शिक्षक यांचा संप सुरू असून कर्मचाऱ्याच्या संपाला पाठिंबा देत त्यांच्या आंदोलनात सहभाग नोंदवला.गेल्या चार दिवसापासून शासनाच्या मागण्यासाठी संपाच्या हत्यार उपसले यावर अद्याप तोडगा निघाला नसल्यामुळे ते त्यांच्या मागण्यावर ठाम आहेत. दि 18रोजी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे, राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी, माजी नगरसेवक अजित जगताप यांनी पाठींबा दिला.
            यावेळी सिद्धेश्वर आवताडे म्हणाले की कोरोना सारख्या भीषण परिस्थितीत शासकीय कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय काम केले आहे, त्यामुळे त्यांच्या प्रश्नासाठी आम्ही सदैव खांद्याला खांदा लावून काम करू. त्यांच्या मागण्यामध्ये सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करा सर्व कंत्राटी कर्मचान्यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थश्रेणी कर्मचान्यांची पदे निरसित करु नका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचान्यांना सेवांतर्गत आन्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या, व ईतर अनुषंगीक मागण्या दिर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे अखेर संपाचे हत्यार उपसले. त्यामध्ये तालुक्यातील शासकीय रुग्णालय,माध्यमिक शाळा,

महाविद्यालय,नगरपालिका, तहसील कार्यालय, बांधकाम, कृषी,जिल्हा परिषदेच्या आखत्यारीतील बांधकाम,पशुसंवर्धन,शिक्षण, आरोग्य,आरोग्य,पाणीपुरवठा, या विभागातील कर्मचारी सहभागी झाले.

           संपामुळे पंचायत समिती तहसील कृषी बांधकाम या शासकीय कार्यातील कामकाज पूर्णपणे थांबले आहे त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना याचा नाहक त्रास तो असावा लागला तर दुसऱ्या बाजूला मनरेगा, घरकुल या शासकीय त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना मात्र रिकाम्या हाती परतावे लागले तर उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी प्रश्नाशी निगडित असलेल्या अनेक कामे या संपामुळे थांबली. तहसील कार्यालयात नवीन पीएम किसान नोंदणी व पुरवठा विभागात शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठी आलेल्यांना देखील रिकाम्या हाती परतावे लागत आहे.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More