पाटकळ व डोंगरगाव येथील वायरमनला मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी
राजेंद्र कदम व आबा झेंडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील पाठकल येथील राजेंद्र नारायण कदम या वीजग्राहकास कायमस्वरुपी कनेक्शन बंद असल्याने नोटीस बजावणी करिता गेलेले महा वितरण चे वायरमन अकिब मुलाणी व डोंगरगाव येथे अनधिकृत आकडा काढत असताना सागर कुंभार यांना शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देवून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी राजेंद्र नारायण कदम रा.पाठकल व आबा बापु झेंडे रा. डोंगरगाव यांच्याविरोधात मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एकाच दिवशी महावितरण ची वीज वसुली करणाऱ्या दोन कर्मचाऱ्याना मारहाण झाल्यामुळे वीज कर्मचारी संघटना मधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की
फिर्यादी सागर महादेव कुंभार वय 29 वर्षे सध्या रा. एकवीरा माळ, मंगळवेढा हे मंगळवेढा शहर शाखा कार्यालय येथे वायरमन म्हणुन काम करीत असून दि.10सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजनेचे सुमारास मंगळवेढा शहर शाखा अतर्गत येणारे डोंगरगाव गावातील बाबासाहेब यशवंत साखरे याचे कायमस्वरुपी कनेक्शन बंद असल्याने त्याचे नोटीस बजावणी करिता त्याचे राहते घरचा शोध घेत डोंगरगावात गेले होते. दरम्यान आबा बापु झेंडे रा. डोंगरगाव यांचे घराजवळुन जात असताना आबा बापु झेंडे यांनी तु आमचे घरावर टाकलेला आकडा का काढत आहेस तु आमचे घराचे पाठीमागे का जात आहेस असे म्हणून अडथळा आणुन शिवीगाळ केल्याप्रकरणी आबा बापु झेंडे याने सरकारी कामात अडथळा आणून लाथाबुक्क्याने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन आबा झेंडे याचेविरुधद सागर कुंभार यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत फिर्यादी अकीब अकबर मुलाणी वय 22 वर्षे बाहयस्तोत्र कर्मचारी असून शाखा कार्यालय आंधळगाव अंतर्गत पाटकळ येथे कार्यरत आहे. ज्या ग्राहकांची कायमस्वरुपी कनेक्शने बंद असलेल्या पाठखळ गावातील नोटीसची बजावणी करीत करीत असताना राजेंद्र नारायण कदम याचे कायमस्वरुपी कनेक्शन बंद असल्याने त्याचे नोटीस बजावणी करिता त्याचे राहते घरासमोर दुपारी 3 वाजता फिर्यादी गेले.त्यावेळी राजेंद्र नारायण कदम यांना घरातुन बाहेर बोलावुन घेतले व त्यांना तुमचे कायमस्वरुपी वीजबिल थकीत असल्याने तुमचे कायमस्वरुपी कनेक्शन बंद करण्यात आलेले आहे त्याची नोटीस तुम्हाला देण्याकरीता आलो आहे ती घ्या असे म्हणालो असता राजेंद्र नारायण कदम याने वायरमन मुलाणी यांना तुम्ही आमच्या घरी कशाला आलेला आहे तुम्ही येथून निघुन जावा मी नोटीस घेणार नाही असे म्हणुन शिवीगाळ करु लागला त्यावेळेस मी त्यांना तुम्ही मला शिवीगाळ करु नका असे समजावुन सांगत असताना त्याने सरकारी कामात अडथळा आणुन तुला आत्ता जिवंत ठेवत नाही असे म्हणुन हातात दगड घेऊन डावे बरगडीवर मारुन मुक्का मार दिला असल्याची फिर्याद मुलाणी यांनी दिली असून राजेंद्र कदम याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

