Take a fresh look at your lifestyle.

नंदेश्वर येथे तिहेरी हत्याकांड

एकाच घरातील तीन महिलांची निर्घृण हत्या

5,303

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
               मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे आज दिनांक २१ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणावरून एकच घरातील तीन महिलांची दगडाने व बेडग्याच्या सहाय्याने ठेचून हत्या केल्याची घटना घडली असून याबाबत पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे दिपाली बाळू माळी (वय २०) पारू बाबाजी माळी (वय ५०) संगीता माळी (वय ४५) असे त्या तीन महिलांची नावे आहेत या तिहेरी हत्याकांडामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे
          याबाबत अधिक माहिती अशी की या घटनेची माहिती अशी की मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील लोहार मळा महादेव माळी व त्यांची मुले बाळू व दत्ता तसेच सून असे कुटुंब रहात होती गेल्या काही दिवसापूर्वी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य मयत झाल्याने ते सर्वजण गावातून रानात रहात होती आज त्यांच्या घरातील बाळू त्याची आई सांगोला येथे दवाान्यांमध्ये गेले होते त्यामुळे घरी त्या तीन महिला व बाळू याचा लहान मुलगा असे होते लहान मुलगा हा दुपारी झोपला असताना दुपारी घरी पुरुष माणूस नसताना अज्ञात कारणावरून दिपाली बाळू माळी, पारूबाई बाबाजी माळी, संगीता महादेव माळी या तीन महिलांचा दुपारी १ते अडीच दरम्यान दगडाने ठेचून हत्या करण्यात आली ह्या तिन्ही महिला घराच्या अंगणात पडल्या होत्या बाळू v त्याची आई दवाखान्यातून आल्यानंतर त्यांना घराच्या समोर पडलेल्या त्या तीन मृत महिला दिसल्यानंतर ही घटना माहीत पडली.
               माळी कुटुंबाचा हॉटेल व्यवसाय व कापड व्यवसाय असून व्यवसायानिमित्त इतर पुरुष मंडळी दुपारी त्यांच्या दुकानात असताना हा प्रकार घडला आहे माळी कुटुंब स्वभावाने अत्यंत गरीब असून त्यांच्या बाबतीत हा प्रकार घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे या घटनेतील पारुबाई संगीता ह्या दोघी बहिणी बहिणी आहेत या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक शिरीष सर देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील पो नी रणजित माने सदर ठिकाणी तातडीने हजर झाले पोलिसांनी एका संसदेत ताब्यात घेतले असून वेगवेगळ्या अँगलने पोलिसांचा तपास सुरू आहे पोलिसांची शोध यंत्रणा कामाला लागले असून या घटनेमागील गुढ शोधण्यासाठी तपास करीत आहेत

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More