Take a fresh look at your lifestyle.

तामदर्डी येथे भीमा नदीवर बंधारा बांधण्यासाठी 35 कोटी मंजूर – आ. समाधान आवताडे

पूर्व भागातील नदीकाठच्या शेतकऱ्यांचा शेतीचा पाणीप्रश्न मिटणार

235

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी येथे भीमा नदीवर कोप बंधारा बांधण्यासाठी 34 कोटी 99 लाख 43 हजार 406 रुपये मंजूर झाले असून त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून या बंधार्‍यामुळे तमदर्डी, बोराळे, मुंढेवाडी माचनूर,ब्रह्मपुरी,रहाटेवाडी तर मोहोळ तालुक्यातील आरबळी, मिरी, बेगमपूर, अर्धनारी येनकी या गावातील क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

यावेळी बोलताना आमदार आवताडे म्हणाले की सदर बंधारा उभारणीसाठी येथील शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलने केली, सदर बंधाऱ्याच्या ठिकाणी शेतकरी दरवर्षी उन्हाळ्यात पिके वाचवण्यासाठी मातीचा बांध घालून पाणी आडवत होते येथील संबंधित शेतकऱ्यांनी माझ्याकडे येऊन या बंधाऱ्यासाठी पाठपुरावा करा अशी मागणी केल्यानंतर नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी करून या बंधाऱयाला तात्काळ मंजुरी द्या अशी मागणी केली होती त्यानुसार सरकारने संबंधित बंधाऱ्याला निधी देऊन येतील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत बंधारा मंजूर केला आहे. शासन निर्णयानुसार या बंधार्‍याची पाणी वाटप संस्था करण्यासाठी ठेकेदारास बंधनकारक करण्यात यावे,कामाचा खर्च उपलब्ध अनुदानातून प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेत करण्यात यावा, व नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यात यावे. सदरचे काम पूर्ण होईपर्यंत त्रैमासिक प्रगती अहवाल शासनास सादर करावा. काम पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतचा पूर्णत्वाचा अहवाल शासनास सादर करावा. कामाचे जिओ टॅगिंग व व्हिडिओ चित्रीकरण बंधनकारक राहील. या कामाचा पाच टप्प्यात जिओ टॅगिंग व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावा. व्हिडिओ चित्रीकरण करताना प्रत्येक वेळेस कामाचे जलसंधारण अधिकारी व कंत्राटदार यांच्या प्रशिक्षित तांत्रिक कर्मचारी यांची उपस्थिती अनिवार्य आहे. काम चालू असताना व पूर्ण झाल्यानंतर कामाची गुण नियंत्रणाच्या दृष्टीने विभागाच्या दक्षता व नियंत्रण पथकाकडून तपासणी करण्यात यावी. प्रकल्पाचे हस्तांतरण झाल्यानंतर देखभाल दुरुस्तीचा खर्च लाभार्थ्याकडून करण्यात यावा. आर्थिक दायित्व निर्माण होईल अशा नवीन घटकांचा शासन मान्यते शिवाय प्रकल्पात समावेश करण्यात येऊ नये.अशा अनेक अटींसह कोप बंधाऱ्यास मंजुरी दिली असून या मंजुरीमुळे येथील शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार असून लवकरात लवकर काम सुरू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.

 

 

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More