Take a fresh look at your lifestyle.

अधिकाऱ्यांनो कामकाजात सुधारणा करा अन्यथा कारवाईला सामोरे जा-आ.समाधान आवताडे

आमदार समाधान आवताडे ॲक्शन मोडवर, माजी आ.प्रशांत परिचारक यांच्यासमवेत आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

800

- Advertisement -

 

 

मंगळवेढा प्रतिनिधी

         केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनाचा शेवटच्या घटकापर्यंत  लाभ द्या. तसेच विविध विकास कामात हलगर्जीपणा झाल्यास  कुणाचीही गय करणार नाही. अधिकाऱ्यांनी मंजूर कामे गुणवत्तापूर्ण व  वेळेत पूर्ण करून घ्यावीत. काही अधिकाऱ्यानी कामात सुधारणा करावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे असा सज्जड दम आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा येथे झालेल्या आढावा बैठकीत  दिला. तसेच दर महिन्याला प्रत्येक विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेतला जाईल, त्यामुळे कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आमदार समाधान आवताडे यांनी यावेळी दिल्या.

            मंगळवेढा येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये प्रशासनातील सर्व खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती यावेळी आमदार आवताडे बोलत होते या बैठकीला माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, प्रांताधिकारी बी. आर. माळी, तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी योगेश कदम, जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर,माजी सभापती तानाजी काकडे,माजी उपसभापती सुरेश ढोणे,रामेश्वर मासाळ, माऊली कोंडुभैरी,प्रकाश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

            या आढावा बैठकीमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी प्रत्येक विभागाच्या खाते प्रमुखांकडून सर्व विभागातील कामाचा आढावा घेतला. योजनेच्या अंमलबजावणी मध्ये आपल्याला काही अडचणी येतात का?,इतर काही साधनसामुग्रीची कमतरता आहे का?काम करण्यास तुमच्या काही अडचणी आहेत का ? याची सविस्तर माहिती घेण्यात आली यावेळी पंचायत समिती बांधकाम खात्याकडे निविदा स्तर कामे किती? पूर्ण किती? अपूर्ण किती? सुरू न झालेली किती याची माहिती घेऊन ज्या ठेकेदाराने टेंडर घेऊन सहा महिने काम सुरू केले नाही त्या ठेकेदारांना आजच्या आज नोटिसा काढून ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा सूचना देण्यात आल्या.

        नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेत असताना अनेकांनी नगरपालिकेच्या कारभाराविषयी तक्रारी केल्या. गटारी तुंबल्या आहेत साथीचे रोग वाढत आहेत एका कुटुंबात अनेक घरकुले दिली आहेत मुख्याधिकारी कसलेही लक्ष घालत नाहीत अशी तक्रार एका नागरिकांने केली असता आमदार अवताडे यांनी तुम्हाला मंगळवेढ्याचे काम झेपत नसेल तर जागा मोकळी करा जबाबदार अधिकारी काम करण्यासाठी येईल असे म्हणत आठ दिवसात कामकाजात सुधारणा करा अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल अशी तंबी मुख्याधिकाऱ्यांना दिली.

        कृषी विभागाला विम्यामध्ये बोगसगिरी होत असून बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने येणाऱ्या काळात टंचाई जाणवण्याची शक्यता असून त्यांचा आराखडे तात्काळ तयार करून पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या त्याचबरोबर काही ठिकाणी जलजीवनच्या कामांमध्ये निकृष्ट कामे झाल्याच्या तक्रारी आहेत अशा कामांना मी स्वतः भेटी देणार असल्याचेही आमदार अवताडे यांनी सांगितले.एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने लेक लाडकी आणि अंतर्गत 252 लाभार्थ्यांना लाभ तर लाडकी बहीण अंतर्गत 54257 लाभार्थ्यांना लाभ दिल्याचे सांगितले. पशुसंवर्धन विभागाअंतर्गत जनावरांची जनगणना होत असून प्रत्येकाच्या घरी जाऊन अचूकपणे जनगणना करण्याच्या सूचना देण्यात आल्या, शिक्षण व आरोग्य विभागाकडून अनेक पदे रिक्त असून ती पदे तात्काळ भरण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मागणी आमदार अवताडे यांच्याकडे केली तर मंगळवेढा तालुक्यामध्ये 108 नंबर वर अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी 2 अंबुलन्स उपलब्ध आहेत यातील भोसे येथील अंबुलन्स सुरू असून मंगळवेढा येथील ॲम्बुलन्स ला डॉक्टर नसल्याने अपघात असताना मदत करण्यासाठी ही गाडी जात नाही त्या ठिकाणी तात्काळ डॉक्टरची भरती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

          पंचायत समिती अंतर्गत विविध योजनांसाठी ग्रामपंचायत च्या ग्रामसभा ठरावाची आवश्यकता असते अनेक गावांमध्ये ग्रामसेवक हे ग्रामसभा घेत नसून काही ठराविक लोकांची नावे घालून बोगस ठराव देत आहेत याला आळा घाला अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल अशा सूचना गट विकास अधिकारी योगेश कदम यांना आमदार अवताडे यांनी दिल्या. भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे बिल हे कोटीच्या घरात गेले असून शिखर समितीला ही योजना चालवणे शक्य नसून शिखर समिती रद्द करून ही योजना शासनाकडे हस्तांतर करा अशी मागणी यावेळी करण्यात आली                                             यावेळी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून आणलेल्या निधीतून  मंजूर करून आणलेले ट्रांसफार्मर हे आम्ही मंजूर करून आणतो असे सांगून काही जण शेतकऱ्यांकडून पैसे लुबाडत आहेत याकडे  संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांनी  लक्ष द्यावे व कोणत्याही शेतकऱ्याने कोणाला ही पैसे देवू नये असे सांगितले. म्हैसाळ योजना भूमी अभिलेख सहाय्यक निबंधक आगार व्यवस्थापन क्रीडा अधिकारी राज्य उत्पादन शुल्क अन्न औषध प्रशासन भूजल सर्वेक्षण वनविभाग महसूल विभाग आदी विभागांचा आढावा घेत कामात गतिमानता आणा मी अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा प्रत्येक विभागाची स्वतंत्र आढावा बैठक लावून दर महिन्याला कामात किती सुधारणा झाली हे पाहणार आहे व कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार नाही असा इशारा आ. आवताडे यांनी बैठकीप्रसंगी दिला. यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विविध खात्यातील अधिकाऱ्यांना कामे कधी पूर्ण होणार, निधीची काही कमतरता भासते काय, काही अडचणी असल्यास आम्हाला सांगाव्यात त्यावर आम्ही दोघे मार्ग काढू असे सांगितले.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More