बेस्ट सभापती सोमनाथ आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त सुहास पवार यांचा अनोखा संकल्प
15 ते 20 मार्च 23 दरम्यान जन्मलेल्या मुलींच्या नावे करणार 3434 रुपयांची मुदत ठेव
मंगळवेढा प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ अवताडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चोखामेळानगर ग्रामपंचायत हद्दीत मुलीचा जन्मदर वाढावा यासाठी आज दि.15 ते 20 मार्च दरम्यान जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे 3434 रुपयाची मुदत ठेव करून देण्याचा संकल्प सामाजिक कार्यकर्ते सुहास पवार निश्चित केला आहे.
सध्या जिल्ह्यात मुलीचा जन्मदर घटल्यामुळे अनेक विवाह इच्छुक तरुणांना मुली मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. काही नी तर चक्क जिल्हाधिकारर्यांकडे लग्नासाठी मुलगी मागण्यासाठी मोर्चा काढला होता या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली. वास्तविक पाहता मुलीचा जन्मदर वाढावा म्हणून शासन वेगवेगळ्या योजना राबवत आहे. मात्र अजूनही ग्रामीण भागात मुलगाच हवा ही संकल्पना वाढीस लागली आहे.त्यामुळे मुलीचे प्रमाण घटले म्हणून चोखामेळा नगर ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून काम करीत असताना सुहास पवार यांनी पाणी फाउंडेशन,कुपोषित बालकांसाठी,शालेय मुलीसाठी इतर शासकीय योजना व अनेक सामाजिक उपक्रम राबवले.
मुलीचा जन्मदर वाढण्यासाठी यंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ अवताडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी 15 ते 20 एप्रिल च्या दरम्यान जन्माला येणाऱ्या मुलीचे नावे 3434रुपये मुदत ठेव करण्याचा संकल्प निश्चित केलाआहे. जेणेकरून त्या मुलीला ती रक्कम तिच्या शिक्षणासाठी व विवाहासाठी उपयोगी पडू शकेल. याशिवाय या ग्रामपंचायत हद्दीत ज्या मुलीचा विवाह होणार आहे तिला माहेरची साडी म्हणून पैठणी साडी भेट देण्यात येणार आहे. जेणेकरून स्त्री-पुरुषांमध्ये असणारे असमानता कमी होण्यास मदत होईल.

