Take a fresh look at your lifestyle.

तीन महिलांची हत्या केल्याची आरोपी समाधान लोहारची पोलिसांना कबुली

आरोपीस मिळाली 7 दिवसांची पोलीस कोठडी शेतीच्या बांधाच्या कारणावरून व पूर्व वैमनस्यतून हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड

6,203

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

            मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे दिनांक २१ रोजी माळी कुटुंबातील तिहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी समाधान महादेव लोहार वय 33 यास अटक करून पोलिसानी सखोल चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. शेतीच्या बांधाच्या कारणावरून व पूर्व वैमनस्यतून तीन महिलांची दगडाने व बेडग्याच्या सहाय्याने ठेचून जीवे मारल्याचे सांगितले.आरोपीस आज दिनांक 22 रोजी मंगळवेढा येथील न्यायालयासमोर पोलिसांनी हजर केले असता त्यास  7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे 

          याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 21 रोजी दुपारी दीडच्या सुमारास नंदेश्वर येथील लोहार मळा येथे माळी कुटुंबातील दिपाली बाळू माळी (वय २०) पारू बाबाजी माळी (वय ५०) संगीता माळी (वय ४५) या तीन महिलांचा दगडाने व बेडग्याने ठेचून खून करण्यात आला होता याप्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पो नी रणजित माने , सपोनी सत्यजित आवटे, अण्णासो वाघमोडे ,पोलीस उपनिरीक्षक सौरभ शेटे, धापटे व त्यांच्या सहकारी यांनी घटनास्थळाची पाहणी करीत तपास यंत्रणा कामाला लावली. परिस्थितीजन्य पुरावे व माहितीच्या आधारे संशयित आरोपी समाधान महादेव लोहार ताब्यात घेतले.सदर गुन्ह्यात चौकशी करता सुरुवातीला त्यांनी आपण गुन्हा केला नसल्याचे सांगितले. परंतु सखोल चौकशी केल्यानंतर त्याने आपण शेतीच्या बांधावरून व पूर्व वैमन्याशातून तीन महिलांची हत्या केल्याचे कबूल केल्याचे पो नी रणजित माने यांनी सांगितले. तिहेरी  हत्याकांडातील आरोपीला तत्काळ शोधण्यास पोलिसाना यश आले असून आरोपीविरोधात भा द वि 302 कलम लावण्यात आले असून खून करण्यामागे इतर कोणते कारण आहे का याचादेखील तपास पोलिसांकडून सुरू आहे

        आरोपीला अटक केल्यानंतर आज दिनांक 22 रोजी  तपासाधिकरी पो नी रणजित माने यांनी मंगळवेढा येथील न्यायालयासमोर हजर करीत पुढील तपासासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली न्यायलयाने आरोपीस7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

                दरम्यान दिनांक 21रोजी रात्री उशिरा मंगळवेढा पोलीस ठाण्यात सदर गुन्ह्याप्रकरणी मयताचे नातेवाईक दत्तात्रय महादेव माळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  नंदेश्वर येथील लवटे वस्ती येथे राहणाऱ्या समाधान महादेव लोहार वय 33 या इसमाने शेतीच्या बांधाच्या व इतर कारणावरून दिपाली माळी, पारूबाई माळी, संगीता माळी या तिघींचा दगडाने व बेडग्याने ठेचून खून केल्याची फिर्याद दत्तात्रय महादेव माळी रा नंदेश्वर यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात केली आहे या फिर्यादीमध्ये शेतीच्या बांधाच्या कारणाबरोबरच समाधान लोहार याची माळी कुटुंबाच्या घरच्या महिलावर वाईट नजर होती याबाबत त्याला यापूर्वी सुधारण्याबाबत समजावून सांगितले होते असे देखील फिर्यादीत म्हटले आहे
दि 22रोजी दुपारी त्या तीन मृत महिलांवर नंदेश्वर येथील माळी यांच्या  शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी माळी कुटुंबातील सदस्यासह त्या निरागस असलेल्या व आईला पोरके झालेल्या चार वर्षीय मुलाच्या रडण्याने उपस्थित नातेवाईक गावकरी यांचे मन मात्र हेलावून गेले होते

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More