Take a fresh look at your lifestyle.

मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्नावर विधानसभेत आ.समाधान आवताडे यांचा आवाज घुमला

मंगळवेढा उपसा सिंचन योजना, पौट साठवण म्हैसाळ चे पाणी,भोसे प्रादेशिक योजनेबद्दल उठविला आवाज

783

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी

              मंगळवेढा तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी येथील शेतीच्या पाणी प्रश्नासाठी आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी व निधी मिळावा, पौट साठवण तलावास सुधारित मान्यता व निधी देणे, म्हैसाळ योजनेतून शिरनांदगी, मारोळी, पडोळकरवाडी, लवंगी तलाव पाण्याने भरून देण्यासाठी शासनाने निधी व पाण्याची तरतूद करावी यासह भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करून योजना तातडीने सुरू करावी यासाठी विधानसभेत आवाज उठवला आहे.

            सध्या मुंबई येथे विधिमंडलाचे अधिवेशन सुरू असून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे मंगळवेढा तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या शेतीच्या पाणी प्रश्नाबाबत आमदार अवताडे यांनी वारंवार आवाज उठवला आहे. त्यांनी दक्षिण भागाच्या पाणी प्रश्ना बाबत बोलताना म्हणाले,मंगळवेढा तालुक्याच्या 24गावांचा पाणीप्रश्न प्रलंबित आहे.या 24 दुष्काळी गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने मंगळवेढा उपसा सिंचन योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मागील अधिवेशनामध्ये सदरील योजना त्वरित पूर्ण करण्यासाठी याबाबत लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले होते. ते काम अंतिम टप्प्यात आलेले असून, सदरील प्रस्ताव या मार्च अखेरीस मंत्रिमंडळासमोर ठेवून त्यास मंजुरी देवून निधी मिळावा व मंगळवेढा तालुका हा दुष्काळ मुक्त करावा अशी मागणी यावेळी आवताडे यांनी केली.

भोसे प्रादेशिक योजनेच्या निकृष्ट योजनेची चौकशी करण्याची मागणी –

            भोसे व 39 गावासाठी असणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले असून याची चौकशी करावी. या योजनेसाठी 71 कोटी रुपये खर्च करून देखील 11 गावांना पाणीच पोचले नाही. पाच गावातील टाक्यांमध्ये कमी दाबामुळे पाणी टाकीत चढत नाही तसेच या योजनेतील अनेक गावांकडे विज बिल थकल्यामुळे वीजबिल माफ करावे. सध्या योजना बंद आहे शासनाने वीज बिलासाठी तरतूद करावी व या योजनेसाठी सौर ऊर्जेद्वारे वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी केली. त्यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी केली जाईल तसेच सौर ऊर्जेसाठी जागेची उपलब्धता करून दिल्यास या योजनेसाठी सौर ऊर्जा च्या माध्यमातून वीज देऊ तसेच वीजबिला बाबत ऊर्जा मंत्र्यांकडे हप्ते पाडून देण्याबाबत चर्चा करू.संबधित ग्रामपंचायतीनी पुढाकार घेऊन 5-10% वीज बिले भरून सहकार्य करावे.त्यामुळे पाणी टंचाई दूर करण्यासाठी ही योजना चालू करता येईल असे यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

                 तसेच यावेळी दक्षिण भागाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा पौट साठवण तलाव हा महत्त्वकांक्षी प्रकल्प गेल्या आनेक वर्षा पासून पूर्ण झालेला नाही. या या प्रकल्पास २०००मध्ये मंजुरी मिळाली होती त्यानंतर २००९ मध्ये सुधारित मान्यता मिळाली होती परंतु या प्रकल्पाचे अद्याप काम पूर्ण झाले नाही व प्रकल्पाची किंमत वाढली आहे. या प्रकल्पामुळे नऊ गावातील सुमारे दीड हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सद्या या प्रकल्पाची किंमत वाढली आहे त्यामुळे या महत्वकांक्षी प्रकल्पास नव्याने प्रशासकीय मान्यता देऊन आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी आ समाधान आवताडे यांनी केली

               मंगळवेढ्याच्या दक्षिण भागात म्हैसाळ योजनेअंतर्गत पाणी आले आहे परंतु मंगळवेढा वितरीका 2मधून पाईपलाईन टाकून शिरनांदगी व मारोळी येथील साठवण तलाव भरून द्यावेत तसेच पडोलकरवाडी व लवंगी येथील तलावात वेगळी पाईप लाईन टाकून पाणी देण्यासाठी अतिरिक्त पाणी व निधीची तरतूद करण्याची मागणी यावेळी केली. या पाण्या मुळे सद्या या भागातील जनावरांचा व तेथील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More