Take a fresh look at your lifestyle.

दामाजीची गुढी पाडव्याची साखर 20 रुपये प्रमाणे मिळणार -चेअरमन शिवानंद पाटील

कारखान्याच्या आर्थिक स्थैर्य व प्रगतीसाठी साखरेत दरवाढ, 10 रुपये ऐवजी 20 रुपये किलो

1,692

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी
चालू गळीत हंगामामधे कारखान्याची सर्व बँकांची खाती थकीत असलेने विद्यमान संचालक मंडळाने स्वतःचे ७/१२ उतारयावर कर्ज काढून कारखाना सुरु केला आहे कारखान्यासमोर असणारया आर्थिक अडचणी व मागील कर्जाचा बोजा पाहता कारखाना व सभासदांच्या  स्थैर्य व प्रगतीसाठी सभासदांना सवलतीचे दराने दिली जाणारी साखर यापुढे प्रति किलो रु २० या दराने दिपावली व पाडवा या सणाकरिता प्रती शेअर्स २५ किलो चांगल्या प्रतीची साखर देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती  चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.

             दिनांक 15रोजी दामाजीच्या संचालक मंडळाची बैठक होवून त्यामधे हा निर्णय घेण्यात आला. शिवानंद पाटील म्हणाले कि, मागील वार्षिक सभेच्या प्रसंगी सभासदांनी साखरेचा दर वाढविला तरी चालेल परंतु चांगल्या प्रतीची साखर सभासदांना द्यावी अशी लेखी मागणी केली होती. तसेच जिल्हयातील इतर साखर काखान्याचे सभासदांना सवलतीचे दराने दिली जाणारी साखर सुमारे रु२५ ते३० प्रति किलो या  दराने दिली जाते. या सर्व बाबींचा विचार करुन जिल्हयातील सहकारी साखर कारखान्याचे तुलनेने आपले सभासदांना दिली जाणारी साखर कमी दराने म्हणजे प्रति किलो रु २०या सवलतीचे दराने दिवाळी व गुढीपाडव्याचे सणाला प्रत्येकी २५ किलो चांगल्या प्रतीची साखर देण्याचा निर्णय या संचालक मंडळाने घेतला आहे.
कारखान्यावर मोठया प्रमाणात कर्जाचा बोजा असल्याने कारखान्यासमोरील आर्थिक अडचणीचा विचार करुन कारखान्याचे कर्मचारी वर्गाने ऑफ सिझनमधील कामकाजासाठी कर्मचारी व वेतन कपात करणेसाठी नेहमीप्रमाणेच सहकार्य करण्याचे ठरविले आहे.

          कारखान्याचे पूर्वीचे ३० हजार व नवीन झालेले १० हजार असे आजअखेर ४० हजाराचे वर सभासद आहेत असून कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे, सभासद व कामगार सुरक्षीत राहिला पाहिजे या साठी हा निर्णय घेतला आहे. ऊस उत्पादक सभासद -शेतकरी, कर्मचारी, तोडणी वाहतुक ठेकेदार यांनी संचालक मंडळावर विश्वास ठेवून ऊस पुरवठा केलेने सर्वांच्या सहकार्याने कारखाना दिडपट क्षमतेने चालविला आहे त्या विश्वासास पात्र राहून आजपर्यंत सभासदांची ऊस बिले, तोडणी ठेकेदारांची बिले, कामगार पगार या संचालक मंडळाने वेळेवर देण्याचा प्रयत्न केलेला आहे असे ही त्यांनी सांगितले .

            सदर प्रसंगी चेअरमन,संचालक मंडळाचे ठरलेल्या धोरणाप्रमाणे येणारया गुढीपाडवा सणाकरिता दि१८मार्च २०२३ ते दि २२मार्च२०२३ या कालावधीत  साखर वाटप केंद्रावरुन साखर देण्याची व्यवस्था करणेत आली आहे. तसेच संबंधीत केंद्रावर कारखान्याने ठरवून दिलेल्या वेळेत उचल न केलेल्या सभासदांची साखर कारखाना साईटवर सुट्टीचे दिवस सोडून दर शुक्रवारी दुपारी २ ते ५या वेळेत डिसेंबर, २०२३ अखेरपर्यंत वाटप केली जाणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक सुनिल दळवी यांनी दिली. ही साखर वाटप 25 साखर वाटप केंद्रतून होणार आहे.कारखाना साईट, मंगळवेढा आफिस ,खोमनाळ नाका,ब्रम्हपूरी ,बोराळे,सिध्दापूर ,
अरळी,डोणज ,नंदूर मरवडे ,
हुलजंती, भोसे, रड्डे , नंदेश्वर, हुन्नूर,लोणार , पाटखळ, शिरसी, आंधळगांव, मारापूर, सलगर बु
मारोळी,निंबोणी, तळसंगी,

               सदर प्रसंगी व्हाईस चेअरमन तानाजीभाऊ खरात, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणू पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील,गौडाप्पा बिराजदार,प्रकाश पाटील,दिगंबर भाकरे,महादेव लुगडे, सिध्देश्वर आवताडे,अशोक केदार, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, कार्यकारी संचालक सुनिल दळवी यांचेसह सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कामगार उपस्थित होते

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More