मंगळवेढयात हमीभाव हरभरा खरेदी केंद्राच्या ऑनलाईन नाव नोंदणीस 2मार्चपासून सुरुवात- चेअरमन सिध्देश्वर आवताडे
मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने होणार खरेदी
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी
मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, नाफेड महाराष्ट्र, राज्य मार्केटिंग फेडरेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 2 मार्च 2023 पासून हमीभाव हरभरा खरेदी केंद्राच्या ऑनलाइन नाव नोंदणी ची मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयामध्ये सुरुवात सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती चेअरमन सिद्धेश्वर बबनराव अवताडे यांनी दिली.
या खरेदी केंद्रामुळे मंगळवेढा तालुका व इतर तालुक्यातील सर्व हरभरा उत्पादक शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ कार्यालयाच्या विभागाकडून एस एम एस प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी हमीभाव खरेदी केंद्रावर आणायचा आहे त्यानंतर विक्री केलेल्या हर्भाऱ्याची रक्कम ऑनलाइन शेतकऱ्यांनी दिलेल्या बँक खात्यावर जमा होणार आहे चालू वर्षी हरभरा या धान्यासाठी आधारभूत किंमत 5335/- रुपये आहे.
नोंदणीसाठी सण 22 -23 च्या हरभरा या पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा आधार कार्ड झेरॉक्स बँक पासबुक ची स्पष्ट दिसत असणारे झेरॉक्स व मोबाईल नंबर ची आवश्यकता आहे
खरेदी केंद्राच्या अधिक माहितीसाठी खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक शंभू नागणे 9405 214 595 ,मच्छिंद्र कोंडूभैरी 9890831934 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

