आंधळगावात राजकीय भूकंप!
सत्ताधारी पाटील माळी गटासह सरपंच लव्हाजी लेंडवे यांचा आ आवताडे गटात होणार प्रवेश
मंगळवेढा तालुक्यातील राजकीय दृष्टया प्रगल्भ असलेल्या आंधळगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून सरपंच लव्हाजी लेंडवे यांनी आपल्या सर्व सदस्यांसह माळी–पाटील गटा चा गावच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार समाधान आवताडे यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून दिनाक 1फेब्रुवारी रोजी आ समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे आ आवताडे यांना गावात कोणीही विरोधक राहणार नसून आंधळगाव वन वे होऊ शकते. त्यामुळे आवताडे यांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आ समाधान आवताडेंची ताकद वाढवणारा ठरणार असून या निर्णयामुळे परिसरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून विरोधी गटाला मोठा धक्का बसला आहे.या गटातील जिल्हा परिषदेच्या उमेदवार करुणा शिवशरण, पंचायत समिती उमेदवार विनायक यादव, दिपाली ताड यांना फायदा होणार आहे.
आंधळगावात गेल्या अनेक वर्षापासून एक सक्षम विरोधक म्हणून माळी–पाटील गटाचा मोठा प्रभाव आहे.गेल्या अडीच वर्षापूर्वी येथील परिचारक गटाचे माजी जीप सदस्य शिवाजीराव नागणे ,दामाजीचे संचालक दिगंबर भाकरे ,दत्तात्रय भाकरे यांनी माळी पाटील गटाचे महादेव माळी काशिनाथ पाटील यांनी एकत्रित येऊन आवताडे गटाचे सुरेश भाकरे व पांडुरंग भाकरे गटाचा पराभव करीत सत्ता संपादन केली होती. परंतु गेल्या अडीच वर्षात कोणतीही विकास कामे झाली नव्हती. त्यामुळे गावचा विकास रखडला होता. गत विधानसभा निवडणुकीत देखील सरपंच लव्हाजी लेंडवे व त्यांच्या गटाने आ आवताडे यांना विरोध केला होता. सद्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक चालू असल्याने माळी पाटील गटाने त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेत कार्यकर्त्यांशी चर्चा करून सर्वानुमते आ आवताडे गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असल्याने आंधळगावात राजकीय समीकरणात मोठा बदल झाला आहे. माळी पाटील गटासह सरपंच लव्हाजी लेंडवे व त्यांच्या सदस्यांनी आवताडे गटाला जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत भाजपला जाहीर पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने या गटात भाजपाचे पारडे जड झाले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील अंधलगाव येथील राजकारणात महत्त्वाचा बदल घडून आला असून, विद्यमान सरपंच लव्हाजी लेंडवे यांच्यासह आवताडे विरोधी गटाने येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून भाजपची ताकद वाढणार असल्याचे चित्र आहे.
अंधलगाव परिसरात दीर्घकाळापासून स्थानिक भालके व आवताडे गट पातळीवर दोन गटांमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच लव्हाजी लेंडवे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत भाजपला पाठिंबा जाहीर केला. विकासाभिमुख राजकारण, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा थेट लाभ गावागावात पोहोचवण्यासाठी भाजपसोबत जाणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.या निर्णयामुळे भालके समर्थक गटाला राजकीय धक्का बसला असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अंधलगाव व परिसरात भाजपला स्पष्ट फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही या निर्णयाचे स्वागत करत लवकरच संघटनात्मक बैठका व प्रचाराची रणनीती आखली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, अंधलगावसह मंगळवेढा तालुक्यातील इतर गावांमधूनही भाजपला वाढता पाठिंबा मिळत असल्याने येणाऱ्या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. माळी पाटील गटासह सरपंच लव्हाजी लेंडवे यांच्या या भूमिकेमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण अधिक तापणार हे निश्चित मानले जात आहे. आवताडे यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे विरोधी गटाची चांगलीच तारांबळ उडाली असून अनेक कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत. काही ठिकाणी आतून नाराजीचा सूर उमटू लागला असून लवकरच आणखी नेते आवताडे गटात प्रवेश करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.एकंदरीत, आंधळगावात झालेला हा राजकीय बदल आमदार समाधान आवताडेंसाठी ‘गेम चेंजर’ ठरणार असून येणाऱ्या निवडणुकांत त्यांना निर्णायक फायदा मिळणार, यात शंका नाही.
सरपंच लव्हाजी लेंडवे यांनी प्रवेशाबाबत भूमिका मांडताना सांगितले की,
“आमदार समाधान आवताडे यांनी महत्वाचा 24 गाव पाण्याचा प्रश्न सोडविला असून नेहमीच तालुक्याच्या विकासाला प्राधान्य दिलेआहे. वीज, रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधा यासाठी त्यांनी कधीही राजकारण आड येऊ दिले नाही. त्यामुळे गावच्या विकासासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला असून दिनाक 1 फेब्रुवारी रोजी आवताडे गटात प्रवेश करणार आहे.”

