नंदेश्वर येथील घटना अमानुष व निंदनीय: माजी आ प्रशांत परिचारक
नंदेश्वर येथील पीडित माळी कुटुंबाचे केले सांत्वन
मंगळवेढा प्रतिनिधी
नंदेश्वर येथील एकच घरातील तीन महिलांची शेती बांधाच्या कारणावरून हत्या होणे अमानुष आणि निंदनीय असून संपूर्ण घटनेचा सखोलपणे छडा लागून पीडित माळी कुटुंबियास योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून आरोपींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील असे माजी आ प्रशांत परिचारक यांनी सांगितले
मानवतेला आणि सामाजिक एकतेला काळीमा फासणा-या नंदेश्वर येथील तिहेरी हत्याकांडात मृत पावलेल्या माळी कुटुंबियाची सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आज दिनांक १मार्च रोजी सांत्वनपर माळी कुटुंबाची भेट घेवुन या दुःखद प्रसंगी माळी कुटुंबियास दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना केली व त्यांना आधार दिला.
यावेळी धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे,श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील,व्हाईस चेअरमन तानाजीभाऊ खरात, जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य युन्नुस शेख,जिल्हा दुध संघ व श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक औदुंबर वाडदेकर, भिवानाना दोलतोडे,माजी जि.प.सदस्य नामदेव जानकर,दामाजी शुगरचे माजी संचालक वसंत बंडगर,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बापु गरंडे,माजी उपसरपंच राहुल कसबे उपस्थित होते.

