अपंग मुलाचे हाल बघवेना,आईची मुलासोबत विहिरीत उडी मारून आत्महत्या
मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील घटना
मंगळवेढा प्रतिनिधी
हुलजंती ता.मंगळवेढा येथील जन्मानेच अपंग असलेल्या पुतण्या मुलाचे हाल बघवत नसल्याने मानसिक तणावाखाली आलेल्या आपल्या शेतातील विहीरीत आईने अपंग मुलासह उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवार दिं.८ ऑक्टोंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. अंबिका इराप्पा माळी वय ३३ व पुतण्या मुलगा विशाल इराप्पा माळी वय ९ असे दुर्दैवी माय लेकरांचे नाव आहे.
या घटनेची खबर मयत महिलेचा दिर जकराया द-यापा माळी, वय ३७ रा. हुलजंती ता मंगळवेढा यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी , फिर्यादी हुलजंती येथील रहिवाशी असून त्यांचे एकत्र कुटुंब असून भाऊ इराप्पा याचा मुलगा विशाल इराप्पा माळी वय ९ वर्षे हा जन्मापासुनच अंपग आहे. त्यास चालता फिरता जेवता येत नाही. त्याचे संपुर्ण पालनपोषण हे भावजय अंबिका ही करत होती. बुधवार दिं.८ ऑक्टोंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पेरणी करणेकरीता हुलजंती येथील हाके यांचे शेतात फिर्यादी काम करीत असताना गावातील उमाशंकर कनशेट्टी यांचा फोन आला की, तुमची वहिनी अंबिका ही तुमच्या शेतातील विहीरीत तिचा मुलगा विशालसह पडुन बुडुन मयत झालेला आहे. असे सांगीतल्याने फिर्यादी तात्काळ सदर ठिकाणी गेले असता तेथे भाऊ इराप्पा व गावातील इतर लोकही हजर होते. भावजय अंबिका इराप्पा माळी वय ३३ वर्षे ही विहीरीतच पाण्यात तंरगत मयत स्थितीत होती. व पुतण्या विशाल इराप्पा माळी वय ९ वर्षे यास माझा भाऊ इराप्पा याने विहीरीतुन बाहेर काढले होते. परतु त्याचीही काही हालचाल दिसुन येत नव्हती. त्यानंतर गावातील काही लोकानी ‘भावजय अंबिका हिचेही प्रेत विहीरीच्या पाण्यातुन बाहेर काढलेले होते. भाऊ इराप्पा यास भावजय अंबिका हि आत्महत्या का केली असे विचारले असता भाऊ म्हणाला की, काही दिवसापासुन तीस मुलगा विशाल हा अंपग असल्याने त्याचे हाल बघवत नसल्याने व मला दोन मुली असल्याने त्या तणावाखाली होती. म्हणुनच तिने मुलगा विशालसह विहीरीत पडुन आत्महत्या केली असल्याचे दिलेल्या खबरीत म्हटले असून पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे.

