Take a fresh look at your lifestyle.

उजनीचे अधिकारी कोमात, मुरूम माफिया जोमात

229

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील उजव्या उजनी कॅनॉल कागस्ट च्या पवार वस्ती नजीक असलेल्या साइड पट्टीवरील लाखो रुपयाच्या किमतीचा मुरूम रॉयल्टी चुकवून उजनी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मुरूम माफियानि सरकारला लाखो रुपयांचा चुना लावला आहे.तालुक्यातील उजनीच्या साइड पट्टीवरील अनेक ठिकाणी मुरूम चोरून नेत असताना देखील उजनीचे अधिकारी आर्थिक लाभापोटी आम्हाला काहीच माहीत नाही असे सांगत दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्या कारभाराबाबत सर्वसामान्य नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

 

गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी कागस्ट तालुका मंगळवेढा येथील पवार वस्ती नजीक असणाऱ्या उजनीच्या मुख्य वरील सुमारे 70 ते 80 लाखाचा म्हणून येथील मुरूम माफियांनी उचलला असल्याची तक्रार येथील एका जागरूक नागरिकाने उजनी विभागाकडे दिली होती.परंतु त्यावर कोणतीच कारवाई न करता उजनी विभागाने आम्हाला काहीच माहिती नसल्याचे दाखवले.उजनीतील काही अधिकाऱ्यांनी मात्र या नागरिकांवरच दबाव आणून कोणतीही कारवाई न करता ही तक्रार प्रलंबित ठेवली आहे संबंधित मुरूम उचलणाऱ्याने कोणतीही रॉयल्टी महसूल अथवा उजनी विभाग कडे भरली नाही तसेच परवानगी न काढता येथील मुरूम मोठ्या प्रमाणात उचला असल्याने येथील उजनी कॅनॉलला धोका निर्माण झाला आहे. भविष्यात पाऊसमान जास्त अथवा उजनीतून पाणी जास्त सोडल्यास येथील कॅनॉल ला धोका निर्माण होऊ शकतो व येथील पाणी येथील लोक वस्ती मध्ये घुसू शकते. तसेच या मुरूम माफीयाने येथील रस्ता देखील फोडून नागरिकांना येणे जाणे बंद होईल अशी व्यवस्था करून ठेवली असल्याने नागरिकांना दूरवरून वळसा घालून वस्तीवर जावे लागत आहे. संबंधित मुरूम उचलल्याची तक्रार एका व्यक्तीने महसूल व उजनी विभागाकडे दिली होती. परंतु उजनी विभागाने दोन महिने होऊन देखील कोणतीही कारवाई न करता व जागेवर न जाता अद्यापही पंचनामा केला नसून आम्हाला सवड मिळेल तेव्हा जागेची पाहणी करून कारवाई करू असे सांगितले जाते. सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात उजनी कॅनॉलच्या साईड पट्टीवरून व इतर ठिकाणाहून मुरूम उचलला जातो परंतु कारवाही काही होत नाही उजनी अधिकाऱ्यांच्या आर्थिक तडजोडीमुळे गुंजेगाव ते नंदुरपर्यंत या मुख्य कॅनॉल वरून अनेक ठिकाणी मुरूम चोरी झालेली असताना उजनीचे अधिकारी हा मुरूम आपला नसल्या सारखा वागून बांधावरून शेळ्या राखण्याचा प्रकार करीत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कोट – उजनी कालव्यावरील कागस्ट येथील मुरुम उचलून नेला आहे . त्याची आमच्याकडे तक्रार आली आहे.परंतु कारवाई काय करायची हे आमच्या सोईने ठरवणार आहे. नागरिक आमच्याकडे उशिरा तक्रारी देतात.

तेजस चव्हाण, शाखा अभियंता उजनी

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More