एम पी एस सी च्या परीक्षेत दामाजी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांचे यश
रोहित भगरे राज्यात दहावा तर प्रज्ञा फटे मुलींमध्ये राज्यात 39 वी
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून 2021 मध्ये घेन्यात आलेल्या परिक्षेत मंगळवेढा शहरातील रोहित भगरे याने राज्यात दहावा तर फटेवाडी येथील प्रज्ञा दगडू फटे हिने मुलींमध्ये राज्यात 39 वा क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे ही दोन्ही मुले दामाजी कारखान्यातील कर्मचाऱ्यांची मुले असून एकाच वेळी दोन मुले राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी ठरल्याने मंगळवेढा तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.
मंगळवेढा येथील रोहित उत्तम भगरे हा विदयार्थी900 पैकी 588 गुण मिळवून राज्यात ताे 10 वा आला आहे.रोहित भगरे याचे प्राथमिक शिक्षण नगरपालिका मुलांची शाळा नं.1,माध्यमिक शिक्षण इंग्लिश स्कूलमध्ये, कनिष्ठ महाविदयालयीन शिक्षण श्री संत दामाजी महाविदयालय,स्थापत्य अभियांत्रिकी पदवी वालचंद कॉलेज सांगली अशा विविध ठिकाणी शिक्षण प्रवास झाला आहे.दरम्यान रोहित भगरे याने मे महिन्यात लेखी परिक्षा झाली होती. तदनंतर दि.22 फेब्रुवारी 2023 रोजी पुणे येथे मुलाखती पार पडल्या होत्या भगरे याची यापुर्वी राज्य कर निरिक्षकपदी निवड झाली होती. रोहित याचे वडील दामाजी कारखान्यात शेतकी विभागात फिल्डमन म्हणून काम करीत आहेत.
प्रज्ञा फटे हिचे पहिल्याच प्रयत्नात यश –
फटेवाडीसारख्या ग्रामीण भागातील प्रज्ञा दगडू फटे हीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२१मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये ९०० पैकी ५२७.७५ गुण मिळवून महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींमध्ये ३९ वी आली आहे . प्रज्ञा फटे हीचे वडिल दगडू फटे हे संत दामाजी सहकारी साखर कारखान्यामध्ये कार्यालय अधिक्षक या पदावर कार्यरत आहेत फटेवाडी सारख्या ग्रामीण भागातुन शेतकरी कुटुंबातील प्रज्ञा फटे हिने पुणे येथे लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची मागील दोन वर्षापासून तयारी करीत असताना २०२० साली आलेल्या कोरोना सारख्या महामारीत सुध्दा मोठया जिद्दीने लॉकडाऊनच्या काळात पुणे सारख्या शहरात राहून मोठया धैर्याने व जिद्दीने अभयास केला प्राथमिक, मुख्य व तोंडी अशा तीनही परिक्षामध्ये तिने पहिल्या प्रयत्नात यश मिळवले आहे.
प्रज्ञा हिचे प्राथमिक शिक्षण फटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण श्री संत दामाजी हायस्कूल मध्ये तर उच्च माध्यमिक शिक्षण श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढा येथे झाले फर्ग्युसन कॉलजमध्ये पदवीचे शिक्षण घेत असताना राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी केली. पुण्यात इनस्पायर स्कालरशिप मिळवत पुढील शिक्षण पूर्ण केले मुलींची शिक्षणाची ओढ ओळखून दगडू फटे यांनी मुलींना उच्च शिक्षीत केले.
कोट—-
शेतकरी कुटुंबातील असूनदेखील आई वडिलांनी कष्ट सहन करत मुलांप्रमाणे शिक्षण दिले अखंड परिश्रम, तपश्चर्या,जिदद् चिकाटीच्या जोरावर पाच वर्षे कुटुबापासून दूर राहून अभ्यासात सातत्य ठेवत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले असले तरी या यशावर अजून मी समाधानी नसून पुढील मोठा टप्पा गाठण्यासाठी अजून प्रयत्न ठेवणार आहे.
-प्रज्ञा फटे
यशाबद्दल आ समाधान आवताडे, माजी आ प्रशांत परिचारक, विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके,धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा शिवाजीराव काळुंगे,दामाजीचे संचालक व खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवताडे, शोभाताई काळुंगे,दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हा चेअरमन तानाजीभाऊ खरात, प्रादेशिक उपसंचालक सोलापुरचे पांडुरंग साठे , कार्यकारी संचालक सुनिल दळवी,सहकार शिरोमणीचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे, दुध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर,रावसाहेब फटे,माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे,अविनाश शिंदे, फटेवाडीच्या सरपंच सिमाताई प्रकाश काळुंगे,उपसरपंच पल्लवी दिगंबर शिंदे, दामाजीच्या माजी संचालिका कविता निकम, डॉ लक्ष्मीकांत मर्दा, किरण शहा, संजय फटे,संभाजी इंगोले,गजानन चव्हाण,अड भारत पवार, अड प्रकाश घुले,सुरेश पवार गुरुजी,विठठल काटकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष विठठल गायकवाड, पतसंस्थेचे चेअरमन विश्वास सावंजी, पत्रकार बाळासाहेब नागणे,संभाजी नागणे यांनी अभिनंदन केले आहे.

