Take a fresh look at your lifestyle.

चोखामेळा नगर गणात तीर्थक्षेत्र विकास आघाडीला भाजपाचा धक्का

उमेदवार संगीता लेंडवे यांचा भाजप उमेदवाराला पाठिंबा

161

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी

                                                                                  मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी जिल्हापरिषद गटामध्ये असलेल्या चोखामेळा नगर गणातून निवडणूक लढवत असलेल्या भालके गट-आघाडीचे तीर्थक्षेत्र विकास  आघाडीचे उमेदवार संगीता राजेंद्र लेंडवे यांनी भाजप उमेदवार दिपाली आनंद ताड यांना पाठिंबा जाहीर करून निवडणुकीतून माघार घेतली आहे.या निर्णयामुळे तीर्थक्षेत्र विकास आघाडीला धक्का बसला असून त्यामुळे दिपाली ताड यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे .

                        तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार संगीता लेंडवे यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंगळवेढा पंढरपूर मतदार संघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांच्या कार्याने मी प्रेरित झालेली आहे आ समाधान दादांनी वर्षानुवर्ष मागणी असलेला मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावून काम सुरू केले आहे तालुक्यात भाजप सरकारने विकासाची गंगा आणली असताना भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या उमेदवाराविरुद्ध मी निवडणूक लढवू इच्छित नाही अर्ज मागे घेण्यादिवशी वेळ निघून गेल्यामुळे मला निवडणुकीतून माघार घेता आली नाही त्यामुळे मी माझ्या समोरील उमेदवार ताड दिपाली आनंद यांना पाठिंबा देण्याचे ठरविले आहे असे प्रसिद्धीपत्रक काढून संगीता राजेंद्र लेंडवे यांनी भाजप उमेदवार दिपाली ताड यांना पाठिंबा देत या गणातील निवडणुकीचे वारे थांबवले आहे.

 

                या गटात समोरासमोर दुरंगीच लढत होती त्यामुळे आता केवळ भाजप उमेदवार ताड यांच्या विजयाची औपचारिकताच बाकी राहिली आहे संगीता लेंडवे यांच्या पाठिंब्याचे आमदार समाधान आवताडे यांनी स्वागत केले असून विकासासाठी असे प्रत्येकाने एकत्र येऊन भाजपच्या पाठीशी उभे राहिले तर या मतदारसंघाचा विकास कोणीही रोखू शकणार नाही असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. लेंडवे यांनी विकास कामासाठी भाजपा ला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यामुळे या गणात चित्र बदलणार असून याचा भाजपा उमेदवाराला फायदा होणार आहे.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More