Take a fresh look at your lifestyle.

धनश्री होंडात ‘ॲक्टिवा स्मार्ट ‘ दाखल, पो नि रणजित माने यांच्या हस्ते गाडीचे अनावरण

ग्राहकांनी लाभ घेण्याचे दत्तू यांचे आवाहन

718

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
होंडा कंपनीच्या होंडा टू व्हीलर कंपनीच्या नवीन ‘ॲक्टिवा स्मार्ट ‘ या गाडीचे अनावरण होंडा टू व्हीलर कंपनीचे अधिकृत सब डिलर धनश्री होंडा मंगळवेढा येथे पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक रणजित माने यांचे हस्ते करण्यात आले.
         यावेळी बोलताना पो नि रणजित माने म्हणाले की होंडा कंपनीच्या धनश्री होंडा या शोरूममध्ये ‘ॲक्टिवा स्मार्ट ‘ या नवीन गाडीचे अनावरण माझ्या हस्ते होत ही आनंदाची गोष्ट असून दत्तू यांनी अत्यंत कष्टातून व जिद्दीने मंगळवार परिसरात होंडा कंपनीच्या टू व्हीलर चे शोरूम चालवून ग्राहकांची चांगली सोय केली आहे भविष्यकाळातील यापेक्षा चांगली सेवा देऊन ग्राहकांचे समाधान होईल असे कार्य करत राहावे अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी पो नि रणजित माने यांचा सत्कार करण्यात आला.
                या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अजित जगताप, नगरपालिका मंगळवेढा चे माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे, धनश्री होंडा चे सर्वेसर्वा सतीश दत्तू, मॅनेजर आरिफ शेख व धनश्री होंडा सर्व स्टाफ, आदी मान्यवर उपस्थित होते.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More