Take a fresh look at your lifestyle.

भोसे प्रादेशिक योजना सुरू करण्यासाठी आ समाधान आवताडे अँक्शन मोडवर

महावितरण,प्रादेशिक नळपाणी पुरवठा, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक

1,484

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
             मंगळवेढा तालुक्यातील भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासंदर्भात आ. समाधान आवताडे यांनी महावितरण, एमजेपी, ग्रामीण पाणीपुरवठा या खात्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन लवकरात लवकर योजना चालू करण्यासंदर्भात सूचना दिल्या. तसेच योजना सुरू करण्यासाठी लागणाऱ्या निधीची उपलब्धता करण्यासाठी संबंधित मंत्री महोदयांकडे पाठपुरावा करू असे आ समाधान आवताडे यांनी यावेळी सांगितले.
              मंगळवेढा तालुक्यातील भोसे गावासह 39 गावासाठी कै.आ भारत नाना भालके यांनी 73 कोटी रुपयाची योजना मंजूर करून कार्यान्वित केली होती.परंतु ही योजना गेल्या दोन वर्षापासून महावितरण कंपनीची एक कोटी 17 लाखाची थकबाकी तसेच पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी थकित असल्याने योजना बंद आहे त्यामुळे या भागातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये व ही योजना तातडीने सुरू व्हावी यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी महावितरण, एमजेपी व ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांची आज दिनांक 24 रोजी आढावा बैठक घेऊन योजना चालू करण्याच्या दृष्टीने आढावा घेतला. या बैठकीच्या वेळी किती गावांना पाणी मिळते, किती गावांना मिळत नाही, योजनेचे थकीत बिल, काही कामे अपूर्ण राहिले आहेत काय, नागरिकांना त्या त्या गावात उच्च दाबाने पाणी मिळते काय, मिळत नसल्यास पर्यायी उपाय योजना काय, योजना पूर्ववत चालू ठेवण्यासाठी दुरुस्ती खर्च किती येईल, दुरुस्तीचा कालावधी किती लागेल याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच थकित वीज बिल व थकीत पाणीपट्टी साठी लागणारी रक्कम टंचाई निधी, पाणीपुरवठा विभाग यांच्याकडून मिळणारा निधी, dpdc मधून मिळणारा निधी याची देखील चर्चा यावेळी झाली. तसेच तातडीने दुरुस्तीसाठी लागणाऱ्या खर्चाचे इस्टिमेट तयार करण्याच्या सूचना दिल्या.

            यावेळी आमदार अवताडे यांनी येणाऱ्या उन्हाळ्यातील पाणीटंचाई ची तीव्रता पाहता ही योजना तातडीने चालू करून या भागातील नागरिकांना स्वच्छ व चांगले पाणी मिळावे यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहून या योजनेच्या माध्यमातून पाणीटंचाई दूर करावी. ही योजना पूर्ववत चालू ठेवण्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद होण्यासाठी सरकारकडे आपला पाठपुरावा राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी सभापती प्रदीप खांडेकर शिखर समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र खताळ ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे उपअभियंता राजकुमार पांडव ,प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे श्री देशपांडे,महावितरणचे उपअभियंता यशवंत दिघे आदि उपस्थित होते.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More