नंदेश्वर ची घटना माणुसकीला काळीमा फासणारी,आरोपीला कडक शिक्षा व्हावी -आ समाधान आवताडे
खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार
मंगळवेढा प्रतिनिधी
शेती बांधाच्या कारणावरून तीन महिलांची हत्या होणे ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून यातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आ समाधान आवताडे यांनी सांगितले.
नंदेश्वर येथे दिनांक 21रोजी दुपारी 2 सुमारास लोहार मळा येथे महादेव माळी यांच्या कुटुंबातील तीन महिलांची शेजारीच असणाऱ्या समाधान लोहार याने शेती बांधाच्या व इतर कारणावरून दगडाने व बेडग्याने ठेचून हत्या केली या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती माळी कुटुंब हे स्वभावाने गरीब असून हॉटेल व कापड व्यवसाय करून आपले कुटुंब चालवत होते परंतु या घटनेने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. या घटनेमुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी गाव बंद ठेवत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली होती.
आज दिनांक 23रोजी आ समाधान आवताडे यांनी नंदेश्वर येथे माळी कुटुंबाची भेट घेवून सांत्वन केले.यावेळी माळी कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.यावेळी आ आवताडे यांनी ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून आरोपीला कडक शिक्षा होण्यासाठी पोलिस अधीक्षक व पोलिस महानिरीक्षक यांच्याशी बोलून आरोपी विरोधातील परिस्थितीत जन्य पुरावे गोळा करून जास्तीत जास्त शिक्षा व्हावी या दृष्टीने प्रयत्न करावेत तसेच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी सरकार कडे पाठपुरावा करून माळी कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे तसेच ग्रामस्थानी कोणताही कायदा हातात न घेता पोलिसांना या गुन्ह्यात तपास कामी मदत होईल अशी भूमिका घ्यावी त्यामुळे गाव बंद न ठेवता सर्व व्यवहार खुले करावेत असे सांगितले त्यानंतर ग्रामस्थानी गाव सुरू करण्याचा निर्णय घेतला
यावेळी प्रदीप खांडेकर,प्रा येताळा भगत सर, भिवानाना दोलतडे,नामदेव जानकर, बाळासो गरंडे, दादा दोलतडे,अशोक माळी, संजय माळी, सुरेश ढोणे, दत्ता मलगे, भारत गरंडे राहुल कसबे संभाजी खापे,दत्ता साबणे, अशोक चौंडे गुरुलिंग दोलतडे, रावसाहेब फटे आदी उपस्थित होते

