भैरवनाथ शुगर्स चे अनिल सावंत यांच्याकडून पीडित माळी कुटुंबाला एक लाखाची आर्थिक मदत
सावंत यांनी दिला मानसिक व आर्थिक आधार
मंगळवेढा प्रतिनिधी
नंदेश्वर (ता.मंगळवेढा) येथे तिहेरी हत्याकांडात बळी पडलेल्या बाळू महादेव माळी यांच्या कुटुंबाची भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल(दादा) सावंत यांनी भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले व त्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयाची आर्थिक मदत केली.
नंदेश्वर येथे दिनांक 21 रोजी बाळू महादेव माळी यांच्या कुटुंबातील तीन महिलांची शेती बांधाच्या कारणावरून हत्या झाली होती या हत्तीमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक करून पोलिस कोठडी घेतली आहे या तिहेरी हत्याकांडातील बाळू महादेव माळी कुटुंबीयांचा कुटुंबावर मोठा आघात झाला होता. या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होऊन आपल्या सहवेदना व्यक्त करीत भैरवनाथ कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांनी सांत्वन केले व कुटुंबाला आधार देण्याच्या एक लाख रुपयाची आर्थिक मदत यावेळी दिली.तसेच माळी कुटुंबास या दू:खातून सावरण्याचे बळ मिळन्याची प्रार्थना केली.
माळी कुटुंबाचे जे नुकसान झाले आहे ते कधीच न भरून निघणारे आहे, ही घटना खरोखरच मानवतेच्या धर्माला आणि सामाजिक एकरूपतेला काळिमा फासणारी आहे असे सांगत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून माळी कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी अनिल(दादा) सावंत यांनी सांगितले
भैरवनाथ शुगर चे संस्थापक मा.नामदार.प्रा.डॉ.श्री.तानाजीराव सावंत, भैरवनाथ शुगरचे चेअरमन मा.प्रा.श्री.शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शुगर हा नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत आला आहे. त्याच बांधीलकीतून आज असून फूल ना फुलाची पाकळी या भावनेतून भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल(दादा) सावंत यांनी यावेळी बाळू महादेव माळी कुटुंबाला आर्थिक मदत जागेवरच देवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.यावेली शिवसेना तालुका अध्यक्ष अशोक चौंडे, बंडू जाधव, गेणा दोलतडे धनाजी गडदे, लवटे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

