महात्मा फुले व आयुष्यमान जन आरोग्य योजनेतील हॉस्पिटल ची संख्या वाढवणार: आ समाधान आवताडे
सर्व नागरिकांनी हेल्थ कार्ड काढावीत
मंगळवेढा प्रतिनिधी
गोरगरीब रुग्णांना आरोग्य सुविधा चांगली मिळावी यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील जास्तीत जास्त हॉस्पिटल समाविष्ट व्हावीत यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार समाधान दादा आवताडे यांनी सांगितले
ते म्हणाले की केंद्र व राज्य सरकार कडून गोरगरीब व अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना विविध आजारावर मोफत व गुणवत्तापूर्ण उपचार राज्याच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना व केंद्राच्या आयुष्यमान जन आरोग्य योजनेतून दिले जातात या रुग्णांना अजून चांगल्या पद्धतीने उपचार मिळावेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सरकारच्या विविध योजनांची माहिती अनेक रुग्णांना माहीत नसते त्यामुळे कार्यकर्त्यांनी सामाजिक हेतूने या रुग्णांना योजनांची माहिती व्हावी तसेच हेल्थ कार्ड काढण्याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे 5 लाखापर्यंत मोफत आरोग्य विमा असलेले हेल्थ कार्ड प्रत्येक नागरिकांनी काढून आरोग्यासंबंधित योजनांचा लाभ घेतला पाहिजे. मंगळवेढा पंढरपूर तालुक्यात महात्मा फुले जीवनदायी योजना व आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत हॉस्पिटल ची संख्या कमी असून या योजनेचा चा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी जास्तीत जास्त हॉस्पिटल या योजनेत समाविष्ट व्हावी यासाठी लवकरच राज्याचे व केंद्राचे या योजनेचा कार्यभार पाहणारे ओ एस डी बोलावून सर्व डॉक्टर मंडळींची बैठक घेऊन या योजनेची व्याप्ती वाढवली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
कोरोनाच्या कालावधीत मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातील डॉक्टर लोकांनी कमी सोई सुविधा असताना देखील चांगल्या पद्धतीने रुग्णांची सेवा करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत.सद्या आरोग्य सेवेवर जास्त खर्च होत असला तरी सर्वसामान्य व गोरगरिबांना आरोग्य विषयक चांगली सुविधा मिळावी,आर्थिक कारणामुळे कोणालाही आपला जीव गमावा लागू नये यासाठी राज्य व केंद्र सरकारने मोफत आरोग्य योजना व आरोग्य विमा सुरू केले आहेत. या योजनांचा लाभ घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी डॉक्टर व सर्व आरोग्य कर्मचारी यांनी सतर्क राहिले पाहिजे असे सांगितले. दक्षिण भागातील नागरिकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी निंबोणी येथे ग्रामीण रुग्णालयासाठी निधी मंजूर झाला असून येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम लवकर पूर्ण होणार असल्याने या भागातील नागरिकांना उपचारासाठी दूरवर जावे लागणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले
यावेळी शशिकांत चव्हाण, प्रा. येताळा भगत, सुदर्शन यादव,आदित्य मुद्गुल, रावसाहेब फटे, प्रकाश रोहिटे आदी उपस्थित होते

