मंगळवेढा प्रतिनिधी
बठाण ता मंगळवेढा येथे ज्वारीची मळणी करताना वाऱ्याने भूसकट उडून शेजारी घरात गेल्याने शेजारी असणाऱ्या दोन महिलेने फिर्यादी महिलेला व तिच्या जाऊबाईला काठीने मारहाण करत हाताला चावा घेऊन जखमी केले तसेच तोंडावर चटणी टाकून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की बठान ता मंगळवेढा येथे दिनांक 17 रोजी दुपारी 2 च्या सुमारास फिर्यादी कविता अविनाश पाटील आपल्या घरासमोर ज्वारीची मळणी मशीनद्वारे करीत असताना त्याचे भुस्कट उडून शेजारी असणाऱ्या रंजना घोडके पाटील यांच्या घरात गेल्याच्या कारणावरून अश्विनी अरुण घोडके पाटील यांनी फिर्यादी कविता यांना काठीने मारहाण करून डाव्या हाताच्या पंजाचा चावा घेवून जखमी केले तसेच रंजना घोडके पाटील यांनी फिर्यादीची जाऊ राणू पाटील यांच्या तोंडावर चटणी टाकून डोक्याचे केस ओढुन लाथाबुक्याने मारहाण करीत शिवीगाळ व दमदाटी केली असल्याची फिर्याद मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत

