Take a fresh look at your lifestyle.

डोंगरगाव येथील खोट्या गुन्ह्यांची चौकशी करून त्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करावी

भाजपा ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

1,815

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
डोंगरगाव येथील मिस्टर सरपंच ,सरपंच आणि सदस्य कार्यकर्त्यावर ग्रामसभेत झालेल्या हल्ल्याच्या तक्रारींवर लोकशाही मार्गाने न्यायासाठी पाठपुरावा केल्याचा राग मनात धरून आरोपी असलेल्या गुन्हेगारी, गावगुंड सावकार यांनी पोलिसाना हाताशी धरून बळाच्या दबावाने फिर्यादी साक्षीदार कार्यकर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याने याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी भाजपा ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे

               दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी डोंगरगाव ता मंगळवेढा येथे दुपारी साडेबाराच्या दरम्यान ग्रामसभेमध्ये विरोधी राष्ट्रवादी गटाच्या पराभूत झालेल्या पार्टीच्या लीडरने त्या ग्रामसभेत ग्रामसभा बंद पाडण्याच्या व संबंधित सत्ताधारी नवनिर्वाचित आलेल्या सरपंच आणि त्यांच्या सर्व प्रमुख सदस्यांना ग्रामसभेत दारूबंदी वरती ठराव का करता, तंटामुक्त अध्यक्ष का निवडत नाही अजिंठावरील विषय सोडून आयत्या वेळच्या विषयावरती चर्चा करणे भाग पाडण्यासाठी ग्रामसभेचे कामकाज बंद पडण्यात आलं होत. त्या ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून लोकनियुक्त सरपंच सारिका विवेक खिलारे ह्या होत्या सभा तहखूब झाल्या नंतर विरोधी गटातील दहा ते पंधरा लोकांनी अध्यक्षा सरपंच सारिका विवेक खिलारे यांना धक्काबुक्की करून मनास लज्जा वाटेल आशा पद्धतीने 200 लोकांत दहशत निर्माण करून रजिस्टर हातातून हिस्कऊन घेण्याचा प्रयत्न करून शिवीगाळ व धक्काबुक्की केली त्यावेळी समज देणाऱ्या रिपब्लिकन पार्टीचे राज्यसचिव प्राध्यापक डी के सर यांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली सदर प्रकार पोलीस कर्मचारी विभूते यांच्या  समोर झाला असताना देखील तक्रार उशिरा दाखल करून घेतली त्या घटनेतील आरोपीने फिर्यादीला व साक्षीदार महिलेला दमदाटी केली त्याला अटक केली उर्वरित चार आरोपी मोकट असून गावात दहशत पसरवीत असून उलट फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत.

                  ॲट्रॉसिटीचे केस मध्ये गुन्हेगार असणाऱ्या आरोपींना फिर्यादी करून परत नव्याने खोटे गुन्हे दाखल करून त्रास दिला जात आहे कायद्याच्या रक्षकानेच फिर्यादीला अन्य साक्षीदारांना आरोपी केलेले आहे सदरचे गुन्हेगार हे सराईत गुन्हेगार असून गावठी सावकार दारू दुकानदार, राजकीय गावगुंड आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत तरी वरिष्ठ यंत्रणेकडून तपास करावा तसेच या घटनेला जबाबदार असणाऱ्या त्या पोलिस अधिकारयावर खातेनिहाय चौकशी होऊन त्याचेवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कडे  खिलारे यांनी केली आहे.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More