Take a fresh look at your lifestyle.

मंगळवेढ्यात 26 लाख 32 हजाराचा गुटखा जप्त, पो. नि. रणजित माने यांची कामगिरी

चालक, मालक व पुरवठादार या तिघाविरोधात गुन्हा दाखल

1,543

- Advertisement -

मंगळवेढा  प्रतिनिधी

              चडचण येथून अशोक लेलँड दोस्त क्रमांक एम एच 45 ए एफ 37 71या चारचाकी तून मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद येथून अवैधरित्या गुटखा वाहतूक करीत असताना मंगळवेढा पोलिसांनी सुमारे 26 लाख32हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून सांगोला तालुक्यातील वाहन चालक, मालक व चडचण येथील गुटखा पुरवठादार या तिघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
                  

            याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवेढा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चडचण येथून महमदाबाद मंगळवेढा या मार्गावरून अशोक लेलँड या गाडीतून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा वाहतूक करणारी गाडी दिनांक 15रोजी सायंकाळी पावणे सात वाजता येणार असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी आपल्या सहकार्यांसह महमदाबाद येथील रस्त्यावर जाळे लावले त्यानुसार अशोक लेलँड गाडी आढळून आली व गाडी व चालक ताब्यात घेत गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये विमल पान मसाल्याचे 7280 पॉकेट, किंमत आठ लाख 73 हजार 600, तंबाखूचे 7280 पॉकेट, किंमत दोन लाख अठरा हजार चारशे, सुपर पान मसाल्याचे 2040 पॉकेट किंमत, दोन लाख 44 हजार 800, नचमत 999 तंबाखू पॉकेट, किंमत तीस हजार सहाशे आर एम डी पान मसाला 320 पॉकेट, किंमत दोन लाख 49 हजार 600, एम सेंटड तंबाखूचे 320 पॉकेट, किंमत एक लाख पंधरा हजार 200,इतका माल आढलून आला तसेच गुटखा व चार चाकी अशोक लेलँड दोस्त कंपनीची गाडी किंमत नऊ लाख असा एकूण किंमत 26 लाख 32 हजार 200 असा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला याबाबत पोलिसांनी अन्नभेसळ प्रशासनाला माहिती दिली त्यानुसार अन्न व भेसळ प्रशासनाने सदर मालाचा पंचनामा करीत गाडीचा चालक बाजीराव विष्णू बाबर रा. आलेगाव ता. सांगोला गुटख्याचा माल व वाहन मालक दिलीप रामचंद्र मस्के रा. सांगोला व पुरवठादार श्रीशैल उर्फ अप्पू कलमानी रा. चडचण जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक या तिघा विरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश कोळी हे करीत आहेत.

         सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने व त्यांचे सहकारी पीएसआय धापटे, पो हे कॉ महेश कोळी मळसिद्ध कोळी, अजित मिसाळ, प्रशांत चव्हाण यांनी ही कारवाई केली आहे

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More