मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्याच्या शेतीच्या दृष्टीने वरदान ठरणाऱ्या मंगळवेढा उपसा सिंचन योजना मार्गी लागण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद होवून येत्या पंधरा दिवसात शिंदे फडणीस सरकार कडून मंगळवेढयासाठी आनंदाची बातमी मिळणार असल्याची माहिती आमदार समाधान दादा अवताडे यांनी दिली.
मंगळवेढा तालुक्याचा भीमा नदीकाठ मान नदीकाठ व कॅनॉल चा पट्टा वगळता तालुक्याच्या दक्षिण व पश्चिम भागात शेतीच्या पाण्याची अडचण कायमस्वरूपी असल्याने या भागातील शेतकरी शेतीला पाणी मिळावे यासाठी सातत्याने सरकारकडे मागणी करत होते. परंतु ही शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झाली नाही तत्कालीन आमदार कै भारत नाना भालके यांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजुरी व निधीसाठी प्रयत्नशील होते परंतु निधीअभावी योजना मार्गी लागली नाही.2021 च्या पोटनिवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मंगळवेढ्याच्या दक्षिण भागातील गावांना शेतीसाठी पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. आ अवताडे निवडून आल्यानंतर पाणी प्रश्नाबाबत पाठपुरावा सुरू ठेवला
मंगळवेढा तालुका पारंपारिक दुष्काळी तालुका असून त्या तालुक्यातील जनतेने आतापर्यंत खूप सोसले आहे परंतु या भागातील विकास कामांना सरकारकडून भरमसाठ निधी उपलब्ध होत आहे तसेच दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांना उजनीचे पाणी मिळण्याच्या दृष्टीने अंदाजे 1000कोटी रकमेच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी लवकरच निधीच्या उपलब्धतेबाबत आमचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत घोषणा करतील या निधिमुळे योजनेचे काम मार्गी लागणार असून तालुका सुजलाम सुफलाम होणार आहे.
-आ समाधान अवताडे
त्यानुसार 2022 च्या पावसाळी अधिवेशनात आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेला मंत्रिमंडळाची व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी घेऊन या योजनेसाठी निधी देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या त्यानंतर या योजनेतील प्रस्तावात असणाऱ्या त्रुटींची पूर्तता करत तसेच तांत्रिक बाबी दूर करीत या योजनेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला असून या योजनेसाठी शिंदे फडणवीस सरकार मूर्त स्वरूप देण्याच्या तयारीत आहे. आमदार समाधान आवताडे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीकता या कामासाठी उपयोगी ठरणार आहे.
आमदार समाधान आवताडे हे दुष्काळात जन्मलो असले तरी दुष्काळात मरणार नाही या आपल्या वक्तव्याशी ठाम असून त्या भागातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी आपली आमदारकी पणाला लावू असे त्यांनी अनेक वेळा सांगितले देखील आहे. तसेच नंदुर येथील अवताडे शुगर्सच्या कार्यक्रमाप्रसंगी देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेच्या संदर्भात तांत्रिक बाबीची पूर्तता केल्यानंतर ह्या योजनेला निधी देऊन योजना मार्गी लावू व त्याच कामावर आपण पुन्हा अवताडे यांना आमदार करू असे सांगितले होते. दरम्यानच्या काळात आ अवताडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणताही गाजावाजा न करता या योजनेच्या पूर्ततेसाठी व निधीसाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. येत्या काही दिवसात या योजनेच्या पूर्ततेसाठी सरकारकडून आनंदाची बातमी मिळणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले

