Take a fresh look at your lifestyle.

अभ्यासाचे टेन्शन, 16 वर्षीय मुलीची आत्महत्या

मंगळवेढा तालुक्यातील सलगर बु॥ येथील घटना

950

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

          दहावीच्या परीक्षा अभ्यासाचे टेंशन घेवून सलगर बु येथील प्रतीक्षा उर्फ सानिका विठ्ठल चव्हाण या सोळा वर्षीय मुलीने राहते घरात पत्र्याच्या अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आपले जीवन संपविल्याची घटना घडली आहे  असून याची पोलीसात अकस्मात मयत अशी नोंद झाली आहे.

                 पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत विद्यार्थिनी प्रतिक्षा उर्फ सानिका चव्हाण ही इयत्ता दहावी वर्गात सलगर बु॥ येथे शिक्षण घेत आहे. पुढील महिन्यात इयत्ता दहावी वर्गाच्या परीक्षा असल्याने प्रतिक्षा उर्फ सानिका हिने अभ्यासाचे टेंशन घेवून घरात कोणी नसताना दि. 13 रोजी दुपारी दोन वाजता राहत्या घराच्या पत्र्याच्या अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. यावेळी खबर देणारे बाबूराव चव्हाण यांची भावजय सुगंधा ही शेतातून काम करुन घरी आली असता ती घरामध्ये जात असताना प्रतिक्षा उर्फ सानिका हिने गळफास घेतल्याचे प्रथमत: पाहिले असल्याचे दिलेल्या खबर मध्ये म्हंटले आहे. मयत हीस मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात आणून तपासणी केली असती ती मयत झाली असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More