मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा फटेवाडी मारोळी या मार्गावर जाणारी एस टी बस बंद झाल्याने शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू होत असून या मार्गावरील बंद केलेली बससेवा सुरू करावी या मागणीचे निवेदन फटेवाडीच्या सरपंच सीमाताई काळुंगे यांनी आगार व्यवस्थापक रणे यांना दिले आहे
याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवेढा फटेवाडी तळसंगी मार्गे मारोळी ला जाणारी एसटी बस गेल्या काही दिवसापासून बंद आहे या बंद असलेल्या बसमुळे या भागातील मंगळवेढा येथे जाणाऱ्या30ते35 शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे एसटी बसच नसल्यामुळे शाळेला जाणार कसे व वेळेवर पोचणे शक्य होत नसून अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे या भागतील अरुंद रस्त्याचे कारण देत एस टी बंद केली आहे यापूर्वी मारोली ला जाणारी मुक्काम गाडी व दुपारी 12वा मारोली कडे जाणारी बस यामुळे शालेय विद्यार्थ्यांची सोय होत होती परंतु गेल्या काही दिवसांपासून ही बस बंद आहे. शालेय विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहता ही बस पूर्ववत सुरू करावी या मागणीचे निवेदन तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश काळुंगे, माजी सरपंच दत्तात्रय फटे यांनी मंगळवेढा येथील आगार प्रमुख श्री रणे यांना दिले आहे लवकरात लवकर बस चालू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे
यावेळी आगार प्रमुख रणे यांनी बंद केलेली बस लवकरच पूर्ववत करू असे आश्वासन यावेळी दिले

