Take a fresh look at your lifestyle.

मंगळवेढा नगरपालिकेच्या 2 लाखाच्या जिम साहित्याची चोरी

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

606

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा नगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या नागणेवाडी तलावाजवळ नगरपालिकेच्या क्रीडा विभागाने उभारलेल्या ओपन जिमच्या सुमारे दोन लाख साहित्याची चोरी अज्ञात चोरट्याने केली असून याबाबतची फिर्याद मंगळवेढा नगरपालिकेचे कर्मचारी रणखांबे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवेढा नगरपालिकेच्या क्रीडा विभागाने गेल्या दोन वर्षांपूर्वी नागणे वाडी येथील तलावाच्या शेजारी ओपन जिमचे साहित्य बसवले होते नगरपालिकेचे कर्मचारी नितेश रणखांबे हे दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार च्या सुमारास ओपन जिमचे साहित्य पाहण्यासाठी तेथे गेले असता त्यांना साहित्य आढळून आले नाही याबाबत त्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांतराव यांना याबाबत माहिती दिली व त्यानंतर नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने आजूबाजूला साहित्य शोधले परंतु साहित्य सापडले नाही त्यामुळे हे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची खात्री झाल्याने याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली असून सदरचे साहित्य दोन लाख रुपये किमतीचे असल्याचे फिर्यादी नितेश रणखांबे यांनी म्हटले आहे

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More