मंगळवेढा प्रतिनिधी
व्हाट्सअप ग्रुपचे नाव बदलल्याच्या कारणावरून फटेवाडी ता मंगळवेढा येथे संदिपान मोहन वाडदेकर वय35 या युवकाच्या डोक्यात कुऱ्हाड मारून त्याच्या आईवडिलांना दगडाने व काठीने मारून जखमी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सात जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक सात फेब्रुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास संदिपान वाडदेकर हे आपल्या घराजवळ असताना कुलस्वामिनी शिवजन्मोत्सव तरुण मंडळ व्हाट्सअप ग्रुप फटेवाडी चे नाव बदललेच्या कारणावरून गावातीलच चंद्रकांत इंगोले, देवाप्पा इंगोले, नागनाथ इंगोले, ज्ञानेश्वर इंगोले, दादा इंगोले, समाधान इंगोले,अजित इंगोले सर्वजण रा फटे वाडी हातात कुऱ्हाड व काठी घेऊन तिथे आले त्यावेळी नागनाथ इंगोले यांनी हातातील कुऱ्हाडीने संदीपानच्या डोक्यावर मारून गंभीर जखमी केले तसेच इतरांनी काठीने मारहाण करून जखमी केले तसेच चंद्रकांत इंगोले व देवाप्पा इंगोले यांनी फिर्यादीला व त्याच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली.
त्यावेळी बाहेरचा गोंधळ ऐकून फिर्यादीचे आई वडील बाहेर आले असता आईला पाठीवर दगडाने व वडिलांना पायावर काठीने मारून जखमी केल्याची फिर्याद संदीपान वाडदेकर यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत

