Take a fresh look at your lifestyle.

500 रुपये मोजा, मगच रेशन कार्ड ऑनलाइन होईल……

मंगळवेढा पुरवठा विभागात झिरोंचा सुळसुळाट

585

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी

मंगळवेढा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना पदाचा भार सोसवेना झाला असून ऑनलाईन कामकाजासह इतर कामे करण्यासाठी झिरो कर्मचाऱ्यांनी कारभार हातात घेतल्याने या विभागात सवाल गोंधळ वाढला आहे येथील कर्मचारी व झिरो कडून एक रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी 500 रुपये दर पडला असून ही रक्कम दिल्याखेरीज कार्ड ऑनलाइन होत नसल्याने सर्वसामान्य नागरिक हतबल झाले आहेत पुरवठा विभागाच्या अडेल तट्टू भूमिकेमुळे अनेक जण रेशनच्या धान्यापासून वंचित राहत आहेत तसेच येथील सावळ्या गोंधळामुळे शहरातील एका रेशनकार्ड धारकाचा ऑनलाईन नंबर चक्क ग्रामीण भागातील मानेवाडी या गावातील स्वस्त धान्य दुकानदाराला जोडला असून त्या रेशन धारकाला विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागत आहे येथील विभागावर पुरवठा निरिक्षकाचे नियंत्रण नसल्यामुळे नागरिक मात्र हैराण झाले आहेत याबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

              केंद्र व राज्यशासनाने दिवाळीच्या दरम्यान,गोरगरीबांना रेशनकार्ड उपलब्ध व्हावे त्यापासून वंचित राहू नये या उदात्त हेतूने ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडयात नवीन कार्ड देणे,ऑनलाईन करणे आदीसाठी मोहिम राबविण्यात आली. रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी येथिल पुरवठा विभागाने झिरो कर्मचारी ठेवले असून हे झिरो नागरिकांची आर्थिक लूट करून देखील बिनचूक कामे न करता चुकीच्या पध्दतीने कामे करत असल्याने कार्डधारकांना वेळेत ऑनलाईन नंबर मिळत नसल्यामुळे त्यांना शासनाच्या धान्यापासून वंचित रहावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. एक रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी 500 रु द्यावे लागत असून ही रक्कम न देणाऱ्याचे काम अडवले जाते तसेच या 500 मध्ये येथील झिरो आणि त्यांचे वरिष्ठ या मध्ये विभागणी होत असल्याची चर्चा आहे

            या विभागातील एका अधिकाऱ्याला याबाबत एकाने विचारले असता त्या झिरोच्या पगार आम्ही कोठून देणार असा सवाल त्यांनी केला या विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागाचा कारभार पेलेनाशा झाला असून त्यांची सारी मदार झिरो वर असून काय करेल ते झिरो करील अशा अवस्था त्यांची झाली आहे येथे पैसे घेऊन देखील योग्य कामे होत नसल्याने नागरिकांचे हाल हिट आहेत मंगळवेढा शहरातील एका कार्डधारकाने ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात कार्ड दिले होते.हे कार्ड शहरातील स्वस्त धान्य दुकानाला ऑनलाईन नंबर जोडणे अपेक्षित असताना झिरोनी तो नंबर चक्क ग्रामीण भागातील मानेवाडी स्वस्त धान्य दुकानाला जोडला गेला. चुकीचे काम झाल्याची त्या झिरोने कबुलीही दिली. मात्र त्याची दुरुस्ती अदयापही न केल्यामुळे त्या कार्डधारकाला 90 दिवसानंतरही धान्य मिळू न शकल्यामुळे या गरीब कुटुंबीयाला उपासमारीची वेळ आली आहे.

              कार्ड ऑनलाईन करण्यासाठी कार्डधारकांची आर्थिक पिळवणूक होत असताना येथील वरिष्ठ अधिकारी मात्र चक्क झिरोची पाठराखण करत असल्याचे चित्र आहे गेल्या चार महिन्यापुर्वीच येथील पुरवठा निरिक्षकाला लाच स्विकारताना लाच लुचपत विभागने रंगेहाथ पकडून गजाआड केले असतानाही झिरोच्या माध्यमातून ऑनलाइन व इतर कामासाठी होणारी आर्थिक लूट व झीरोंचा वावर विचार करायला लावणारी आहे याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तातडीने लक्ष घालून सम्बधितावर कारवाई करण्याची मागणी होत आहे

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More