Take a fresh look at your lifestyle.

भाविकांची ट्रॅव्हल्स पलटी, एक जण जागीच मयत : 37 जण जखमी

मंगळवेढ्यातील येड्राव फाटा येथे घडली घटना

1,776

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी

देवदर्शनासाठी 38 भाविक घेऊन अतिवेगाने निघालेली ट्रॅव्हल्स मंगळवेढा तालुक्यातील येड्राव फाटा पलटी होऊन एक जण जागीच मयत झाला असून ८ जण गंभीर जखमी झाले आहेत तर २९ जण किरकोळ जखमी झाले आहेत
ही घटना आज बुधवारी दि 18 रोजी सकाळी ६ वाजता मरवडे रोडवर येड्राव फाटा येथे घडली
मध्यप्रदेश , उत्तरप्रदेश येथील भाविकांची ट्रॅव्हल बस भारत यात्रा करीत असू
कर्नाटक येथे देवदर्शन करून ते भाविक पंढरपूर कडे निघाले होते होती दरम्यान येड्राव फाटा येथे ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे पलटी झाली.ट्रॅव्हल बस अतिवेगाने होती तसेच ड्रायव्हर मोबाईल वर बोलत असल्याचे जखमी भाविकांने यावेळी सांगितले घटनास्थळी पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी तात्काळ भेट जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले . यावेळी गावातील नागरिकांनी ही घटना कळताच घटनास्थळी भेट देत भाविकांना बाहेर काढून मदतीसाठी धावले ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक दीपक धोत्रे यांनी जखमींवर उपचार केले असून एकजण मयत झाला आहे आठ जणांना पुढील उपचारासाठी इतर दवाखान्यात पाठवण्यात आले आहे २९ जण स्थिर असल्याचे दीपक धोत्रे यांनी सांगितले

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More