Take a fresh look at your lifestyle.

मंगळवेढा व डोणज येथे चोरटयांचा डल्ला

घर फोडून १ लाख 61 हजाराचा मुद्देमाल लंपास, अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल

293

- Advertisement -

मंगळवेढा प्रतिनिधी

मंगळवेढा शहरात व डोणज या दोन ठिकाणी अज्ञात चोरट्याने घर फोडी करून सुमारे एक लाख 61 हजाराचा ऐवज लंपास केला असून या दोन्ही घटनेत अज्ञात चोरट्यावर  मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे                     

पहिल्या घटनेतील पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी अंकिता सलवदे हया त्यांच्या कुटुंबासह दि.12 जानेवारी रोजी सायंकाळी 4.00 वा. घराला कुलूप लावून औरंगाबाद येथे ते कामानिमित्त गेले होते.दरम्यान,त्यांचा तेथे दोन दिवस मुक्काम पडल्याने ते दि.15 रोजी सकाळी 7.00 वा. डोणजकडे येत असताना सोलापूरला आल्यावर शेजारी राहणारे मनोज सलवदे यांनी फोन करून फिर्यादीच्या पतीस सांगितले.तुमच्या घराचे कुलूप कोणीतरी तोडलेले आहे. तसेच घराचा दरवाजा उघडाही आहे.डोणज येथे पोहोचल्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पतीने घराची पाहणी केली असता कुलूप तोडलेले व घरातील कपाट उघडे दिसून आले.कपडे अस्ताव्यस्त पडलेले तसेच लॉकर तुटलेले दिसून आले.यामध्ये 40 हजार रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे सोन्याचे गंठण,12 हजार रुपये किमतीची 3 ग्रॅम वजनाची ठुशी,4 हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचे सोन्याची मनगटी चेन,8 हजार रुपये किमतीचे दोन गॅ्रम वजनाच्या कानातील रिंगा,55 हजार रुपये किमतीचे विक्रीस आणलेल्या साडया व लहान मुलांचे कपडे,5 हजार रुपये किमतीचे स्टेशनरी साहित्य,25 हजार रुपये रोख असा एकूण 1 लाख 49 हजाराचा मुद्देमाल चोरटयाने चोरून नेल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान त्याच रात्री डोणज गावामध्ये चोरटयांनी 5 घरफोडया करण्याचा प्रताप केला असून अन्य घरामध्ये चोरटयांना काही सापडले नसल्याने त्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली नसल्याचे सांगण्यात आले.

              दुसऱ्या घटनेत मंगळवेढा
शहरातील सराफ गल्लीमधील फिर्यादी महिला संजीवनी सिध्देश्‍वर माळी दि.13 रोजी रात्री 8.00 वा. शनिवार पेठेत रहात असलेला भाऊ सुखदेव माळी यांचेकडे घराला कुलूप लावून गेल्या होत्या. तेथे जेवण केल्यामुळे उशीर झाल्याने मुक्काम फिर्यादीने भावाकडेच केला. दि.14 च्या पहाटे 5.00 वा. भावाने मोटर सायकलवरून सराफ गल्लीतील घरी आणून सोडले.यावेळी फिर्यादीस घराचा कडी कोयंडा उचकटलेला व दरवाजा उघडा दिसला.फिर्यादीने घरात जावून पाहिले असता खोलीतील लोखंडी लॉकरचा दरवाजा अर्धवट उघडा होता.लॉकरमध्ये ठेवलेले 9 हजार रुपये किमतीचे 3 ग्रॅम वजनाचे झुबे, व तीन हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचा सोन्याचा बदाम असा एकूण 12000 रुपये किमतीला मुद्देमाल तेथे दिसून आला नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More