छावणी चालकांच्या थकीत बिलाप्रश्नी बैठक घेणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भैरवनाथ चे अनिल सावंत यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री शिंदे सोबत बैठक, तीन वर्षांपासून 38 कोटींची बिले प्रलंबित
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा व सांगोला छावणी चालकांच्या थकीत बिलाच्या प्रश्नासाठी येत्या पंधरा दिवसात सम्बधित विभागाची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले
मंगळवेढा सांगोला तालुक्यातील छावणी चालकांची गेल्या तीन वर्षांपासून बिले रखडली आहेत छावणी चालकांनी अनेक वेळा शासन दरबार बिलाच्या मागणी साठी हेलपाटे घातले परन्तु बिले मिळाली नाहीत त्यामुळे छावणी चालकांना नव्या सरकारकडून बिलाबाबत अपेक्षा वाढल्या या प्रलंबित बिलाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मंगळवेढा येथील भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या पुढाकाराने मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत बैठक होऊन येथील छावणी चालकांच्या बिलाच्या अडचणीबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी अनिल सावंत यांनी 2019 च्या दुष्काळात मंगळवेढा व सांगोला तालुक्यामध्ये जनावराची उपासमार होऊ नये म्हणून छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या त्यावेळी छावणी चालकांनी शासकीय नियम व अटींचे पालन करीत छावण्या सुरू ठेवल्या जनावरे जतन करण्यासाठी चारा, पशुखाद्य व इतर खर्चाची देयके देण्यासाठी स्थानिक संस्था व बँकांची कर्जे काढून अदा करावी लागली आहेत. काही बिले शासनाकडून मिळाली आहेत परन्तु शेवटच्या टप्प्यातील मंगळवेढा व सांगोला या तालुक्यातील जवळपास 38 कोटी रुपयांची देयके प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून देत बिले लवकर मिळण्याची मागणी केली
मुख्यमंत्री शिंदे यांनी येत्या पंधरा दिवसात बैठक लावून प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले या आश्वासनामुळे छावणी चालकांच्या अपेक्षा वाढल्या असून छावणीच्या बिलाचा प्रश्न सावंत बंधूंच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात गेल्याने छावणीचे बिल मिळण्याची आशा वाढली असल्याची प्रतिक्रिया उपस्थित छावणी चालकांनी दिली
या बैठकी वेळी आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत,भैरवनाथ शुगर्स चे व्हा चेअरमन अनिल सावंत, पाठखल चे सरपंच ऋतूराज बिले , गौडापा बिराजदार,अशोक लेंडवे,संभाजी लवटे,विष्णू मासाल,पप्पू स्वामी,हौसप्पा शेवडे, ताय्यापा गरंडे,निलेश आवताडे ,गुलाब थोरबोले ,नितीन पाटील,दीपक सुडकेआदी उपस्थित होते

