जिजाऊ जयंती निमित्त महिला मेळावा, प्रसिद्ध वक्ते गणेश शिंदे यांचे व्याख्यान
उद्योजक संजय आवताडे यांची माहिती
मंगळवेढा प्रतिनिधी
राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त स्व महादेवराव(आण्णा) बाबुराव आवताडे प्रतिष्ठान मंगळवेढा यांच्या वतीने दि 11 रोजी मंगळवेढा येथे भव्य महिला मेळावा व सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांचे व्याख्यान होणार असल्याची माहिती उद्योजक संजय आवताडे यांनी दिली
मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूल च्या मैदानावर हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे सदस्य आ समाधान आवताडे, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.अंजलीताई अवताडे, शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ.प्रियदर्शनी कदम महाडिक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

