दामाजीकडून 15 डिसेंबर अखेर 12 कोटी बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा : शिवानंद पाटील
साखर उताऱ्यात दामाजीचा जिल्हयात दुसरा क्रमांक
मंगळवेढा प्रतिनिधी
संत दामाजी साखर कारखान्याच्या हंगाम २०२२-२३ करिता गळीतास आलेल्या ऊसाचे दिनांक 1ते15 डिसेंम्बर22 पर्यंतचे 2300 प्रमाणे ऍडव्हान्स बिल सभासद-शेतक-यांचे मागणीप्रमाणे व त्यांचे सोयीनुसार संबंधीत बँकांमध्ये वर्ग केले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन शिवानंद यांनी पाटील दिली
सदरचे बिल धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा व त्यांचे विविध शाखामध्ये कार्यक्षेत्रातील व गेटकेन ऊसाचे बिल, जिजामाता महिला नागरी बि शेती सह पतसंस्था, रतनचंद शहा सह बँक,मंगळवेढा, बँक ऑफ इंडिया शाखा मंगळवेढा, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक लि शाखा मंगळवेढा मध्ये पंधरवाडयाचे बिल रुपये 12,03,39,633/ संबंधीत शेतक-यांचे मागणीनुसार खात्यावर वर्ग केले आहेत तसेच 31 डिसेंबर 2022 अखेरचे तोडणी वाहतूक बिलही ठेकेदारांचे मागणीनुसार बँका/पतसंस्था मधील खात्यावर वर्ग केल्याचे सांगितले
कारखान्याच्या चालू गळीत हंगामामध्ये दिनांक 8जानेवारी 2023 रोजी एका दिवसात 5300 क्विंटल साखर उत्पादनाचा उच्चांक केला आहे यापूर्वी दामाजी साखर कारखान्यामध्ये दि 14 मार्च 2012 या दिवशी 5250 क्विंटल साखरेचे एका दिवसात उत्पादन झाले होते संत दामाजी साखर कारखान्याच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये गेल्या ३० गाळप हंगामामधील हा विक्रम असल्याचे संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन श्री शिवानंद पाटील यांनी सांगितले
कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता 2500 मे टन प्रति दिन असताना दररोज सरासरी 3700 ते 3800 मे टन गाळप होत आहे दामाजी कारखान्याचा दैनंदिन साखर उतारा 11.12 टक्के आहे सरासरी उतारा 10.15 टक्के असून हा उतारा जिल्ह्यामध्ये दुस-या क्रमांकाचा असल्याचे कार्यकारी संचालक सुनिल दळवी यांनी सांगीतले
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हा चेअरमन तानाजी खरात, सर्व संचालक,सर्व खातेप्रमुख विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते

