गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे नगरपालिका शाळांची राज्यभर ख्याती :योगेश डोके
न पा मुलांची शाळा 2 मधील शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
मंगळवेढा प्रतिनिधी
मंगळवेढा नगरपालिकेच्या शाळांमधून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याने या शाळांची ख्याती राज्यभर आहे नगरपालिका शाळांमधून भौतिक सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी नगरोत्थान योजनेतून शाळा क्र एक व दोन साठी नवीन इमारत बांधण्यासाठी एक कोटी चा निधी मिळणार असून त्यासाठी आ समाधान आवताडे यांनी शिफारस केल्याची माहिती मंगळवेढा नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी योगेश डोके यांनी दिली
नगरपालिका मुलांची शाळा क्रमांक दोन येथील 19 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केल्याने आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष अरुणाताई माळी ह्या होत्या यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ अवताडे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप, प्रशासनाधिकारी शाहू सतपाल, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, मुख्याध्यापक राजकुमार मांजरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांत कोंडूभैरी, मार्गदर्शक शिक्षक शिवलिंग राऊत आदी उपस्थित होते
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ अवताडे म्हणाले, आमदरसाहेबांनी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून नगरपालिका शाळा पाच या शाळेसाठी 50 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला असून भविष्यकाळात देखील नगरपालिका शाळांच्या देखभाल दुरुस्ती व इतर शैक्षणिक साधना साठी निधी देऊ. अरुणा माळी म्हणाल्या, नगरपालिका शाळा व येथील शिक्षक दर्जेदार असून गुणवत्तापूर्ण आहेत. त्यामुळे येथील विदयार्थी अव्वल आहेत नगरपालिका शाळांना चांगली खोल्या व इतर सुविधा द्याव्यात. पक्षनेते अजित जगताप म्हणाले, नगरपालिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न केला असून विदयार्थ्यानी केवळ एवढ्या यशावर न थांबता भविष्यकाळात मोठे अधिकारी उद्योजक व्हावे असे सांगितले.
यावेळी 19 यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तू देऊन करण्यात आला. मार्गदर्शक शिक्षक शिवलिंग राऊत यांचाही सपत्नीक सत्कार उपस्थित पालक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी झेप परिवाराचा आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार मिळालेले संभाजी नागणे, फटेवाडीच्या सरपंच सीमाताई काळुंगे, संचालक संजय चौगुले या पालकांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी दिगंबर यादव, प्रकाश काळुंगे, संजय चौगुले, संभाजी नागणे, प्रा विश्वनाथ ढेपे, शिवाजी बेलभंडारे, सुशेन शिरसागर, अशोक इंगळे, डॉ समाधान माळी, प्रा लता माळी, मुलाणी सर, आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरेंद्र राक्षे यांनी केले

