सकारात्मक पत्रकारिता सामाजिक हिताची: आ समाधान आवताडे
पत्रकार दिनी मंगळवेढ्यात आ.आवताडे यांच्याकडून पत्रकारांचा सत्कार
मंगळवेढा प्रतिनिधी
सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून उपेक्षित घटकांना न्याय देण्याचे काम पत्रकार करीत असतात मतदारसंघाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी व पत्रकार यांनी समन्वयाने भूमिका ठेवत विकासात्मक दृष्टीने काम करत राहू तसेच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विकास कामांसाठी सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून आणत असल्याचे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा येथे केले
राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधक आमदार समाधान आवताडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने मंगळवेढ्यातील पत्रकारांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी झेप परिवाराचा ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार संभाजी नागणे यांना तसेच व्यापक व्यक्तिमत्व म्हणून पुरस्कार मिळालेले नारायण माने यांचा सत्कार आ समाधान आवताडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला तसेच यावेळी विविध नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार अवताडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आ अवताडे बोलताना म्हणाले पत्रकार हा समाजाचा आरसा असून त्यांनी समाजातील चुकीच्या, चांगल्या गोष्टी निदर्शनास आणून द्याव्यात मंगळवेढ्यातील पत्रकारांना सामाजिक विषयाची जाण असून त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची सरकार दरबारी तसेच अधिवेशन काळात मांडणी करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी या नात्याने मी करीत असतो तालुक्यातील विविध प्रश्न, नागरिकांच्या अडचणी, समस्या निदर्शनास आणून दिल्यास त्यावर प्रशासनाकडून प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला जाईल
पत्रकारानी केवळ नकारात्मक बाजूने मांडता सकारात्मक बाजू मांडून चांगल्या गोष्टींची दखल घ्यावी पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असून पत्रकार भवन व गृहनिर्माण सोसायटी साठी मदतीसाठी तयार असल्याचे सांगितले केंद्रात व राज्यात एका विचाराचे सरकार असल्याने मतदार संघातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळत असून या निधीतून अनेक प्रश्न मार्गी लागत असल्याचेही सांगून भविष्यकाळात मागील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले
यावेळी कार्यक्रम प्रसंगी मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ अवताडे, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, दामाजीचे माजी संचालक सुरेश भाकरे,युवा मोर्चाचे सुदर्शन यादव, प्रमोद म्हमाने, ज्ञानेश्वर बळवंतराव संतोष पवार प्रशांत घोंगडेआदी उपस्थित होते सूत्रसंचालन संतोष मिसाळ सर व दिगंबर यादव यांनी केले यावेळी शहर ग्रामीण भागातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते

