Take a fresh look at your lifestyle.

साडेपाच वर्षीय मुलीस टिपरने चिरडले बालाजी नगर येथील घटना

आईसोबत रस्ता ओलांडत असताना घडली घटना

1,179

- Advertisement -

मंगळवेढा  प्रतिनिधी
मंगळवेढा – चडचण रस्त्यावर बालाजी नगर फाटा येथे मंगळवेढा येथे दवाखान्यासाठी आईसोबत निघालेल्या शिवण्या संतोष पवार या
साडेपाच वर्षीय अंगणवाडी तील मुलीला कर्नाटक मधील वीट वाहतूक करणाऱ्या केए32बी 5231 या टिप्परने चिरडल्याने ही मुलगी जागीच मयत झाली आहे. वाहन व टिपरचालकास पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यावेळी संतप्त ग्रामस्थानी टिपरच्या काचा फोडल्या.
याबाबत अधिक अशी की बालाजी नगर येथील संतोष पवार यांच्या पत्नी आजारी असल्याने दि 8 रोजी दुपारी 12 च्या सुमारास आपल्या लहान मुलीला सोबत घेऊन मंगळवेढा येथे उपचारासाठी निघाल्या होत्या. बालाजी नगर फाटा येथे रस्ता क्रॉस करून जात होत्या दरम्यान त्यांची साडेपाच वर्षीय लहान मुलगी त्यांच्या पाठीमागून रस्ता ओलांडत असताना चडचण कडून भरधाव वेगाने मंगळवेढा च्या दिशेने येणाऱ्या वीट वाहतूक करणाऱ्या टिपर ने त्या लहान मुलीस जागीच चिरडले दरम्यान टीपर चालक हा फोनवर बोलत असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले या घटनेनंतर उपस्थित ग्रामस्थांनी त्या मुलीच्या उपचारासाठी 108 नंबरला संपर्क साधला परंतु ती मुलगी जागीच मयत झाली होती या घटने वेळी उपस्थित ग्रामस्थांनी टीपर चालकाला धरून ठेवत पोलिसांना बोलावून पोलिसांच्या ताब्यात दिले. मंगळवेढा पोलिसांनी टीपर चालक व अपघातातील टिपर ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणून लावला असून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे दरम्यान त्या मयत मुलीवर बालाजी नगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्या मुलीच्या पश्चात आई-वडील व एक सात वर्षांचा भाऊ आहे या घटनेमुळे बालाजी नगर परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी भरधाव धावणाऱ्या वाहनावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More