मंगळवेढ्यातील आगामी निवडणुकात समविचारी ची मोट कायम राहणार
परिचारक- भालके- काळुंगे यांची स्पष्टोक्ती फटेवाडी येथील समविचारी च्या सत्कार समारंभ तिघे एकत्र
मंगळवेढ्यातील आगामी निवडणुकात समविचारी ची मोट कायम राहणार: परिचारक- भालके- काळुंगे
श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व तत्कालीन दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांना रोखण्यासाठी मंगळवेढा तालुक्यात ऐनवेळी समविचारी आघाडीचा निर्णय झाला आणि ह्या एका निर्णयामुळे परिचारक भालके काळुंगे यांच्यासह इतर नेतेमंडळी एकत्रित आले आणि अवताडे यांना दामाजी कारखान्याच्या सत्तेतून पायउतार केल्याने समविचारी आघाडीला पहिले यश मिळाले त्यानंतर नुकत्याच झालेल्या 18 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये बहुसंख्य ग्रामपंचायत आघाडीच्या ताब्यात राहिल्यामुळे समविचारी आघाडीच्या नेते मंडळीचा आत्मविश्वास दुणावला आहे त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील आगामी राजकारण समविचारी विरुद्ध आमदार अवताडे असे राहणार आहे फटेवाडी येथे झालेल्या समविचारी आघाडीच्या नूतन सरपंच व सदस्य यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी विठ्ठल चे माजी चेअरमन भगीरथ भालके youtube कारखान्याचे एमडी रोहन परिचारक व सिताराम कारखान्याचे व धनश्री परिवाराचे प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे यांनी मंगळ तालुक्यात भविष्यातील राजकारण समविचारीच्या माध्यमातून होणार असल्याचे सुतवाच केले यावेळी भगीरथ भालके यांनी बोलताना सांगितले की मंगळवेढ्यातील दामाजी कारखाना सुस्थितीत राहण्यासाठी व शेतकऱ्यांचा मालकीचा राहावा यासाठी सर्व पक्षातील नेते मंडळींनी एकत्र येऊन समविचारीचा विचार एकत्रित आले त्या विचाराला सभासदांनी पाठबळ दिले व कारखाना सध्या आर्थिक अडचणीत असून सुद्धा चांगल्या पद्धतीने सुरू आहे तसेच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बारा पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर समविचारी विजय मिळवला आहे हीच भूमिका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राहणार असून सम विचाराच्या माध्यमातून सर्व निवडणुका लढवणार असल्याचे सांगितले यावेळी युट्युबियन कारखान्याचे एमडी व आमदार प्रशांत परिचारक यांचे सुपुत्र रोहन परिचारक यांनी देखील समविचारी आघाडीच्या कामगिरीचे कौतुक करत
दामाजी कारखान्यासाठी झालेली समविचारी आघाडी केवळ कारखान्यामध्ये स्थित्यंतर केले नाही तर ग्रामपंचायत निवडणुकीत देखील आपला करिष्मा दाखवला आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीपर्यंत कायम राहील पुढचे काय माहित नाही असे सांगत परिचारक यांनी समविचारी ची दिशा स्पष्ट केली समविचारीतील प्रमुख नेते व धनश्री परिवाराचे संस्थापक यांनी देखील
दामाजी कारखान्यात झालेल्या बदलाचे कौतुक करत समविचारी आघाडीने चांगल्या कामाची सुरुवात केली असून येणाऱ्या काळात देखील सर्वांनी मिळून येणाऱ्या निवडणुका सविचारीच्या माध्यमातून लढू आमदारकीच्या निवडणुकीचे त्या त्यावेळी बघू असे सांगत आमदारकीच्या निवडणुकीचा निर्णय माझ्यावर मी मार्ग काढतो असे सांगितले
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष लतीफ भाई तांबोळी यांनी समविचारीने तालुक्यातील राजकारण बदलले असून कारखाना ग्रामपंचायत यामध्ये सत्तान्तर होऊन बदल घडवला भविष्यातदेखील जिल्हा परिषद पंचायत समीती नगरपालिका निवडणुकीत ही आघाडी अशीच कायम राहावी पुढचे पुढे बघू समविचारीमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळणार असल्याचे सांगितले व जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीनंतर येणाऱ्या आमदारकीचा किडा सोडण्याबाबत काळुंगे सरांनी मार काढावा असे सुचवले सध्या मंगळवेढा तालुक्यात समविचारीच्या आघाडीला नागरिकांत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कारखाना ग्रामपंचायत निवडणूक यावरून दिसून येत असले तरी या सविचारी आघाडीतील नेते मंडळी मधील समन्वय आगामी निवडणुका कशा पद्धतीने राहील यावर समविचारीचे भवितव्य अवलंबून आहे

