Take a fresh look at your lifestyle.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका समविचारी समविचरीच्या माध्यमातून लढणार :भगीरथ भालके

फटेवाडी येथील सत्कार समारंभ प्रसंगी मांडली भूमिका

2,033

- Advertisement -

मंगळवेढा  प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणूकीत समविचारी आघाडी अभेद्य राहणार सर्व ठिकाणी समविचारीचा झेंडा फडकेल असे प्रतिपादन विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी फटेवाडी येथे केले
फटेवाडी ता मंगळवेढा येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित समविचारीच्या नूतन सरपंच, सदस्य व दामाजी कारखान्याच्या नूतन संचालक मंडळाच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर व रावसाहेब फटे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झालेल्या फटेवाडीच्या सरपंच सीमा काळुंगे व उपसरपंच पल्लवी शिंदे यांच्यासह 12 गावातील समविचारीच्या माध्यमातून विजय मिळवलेल्या सरपंच व सदस्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा शिवाजीराव काळुंगे होते

यावेळी व्यासपीठावर युटोपीएनचे एम डी रोहन परिचारक, दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील, प्रणव परिचारक, दिपक वाडदेकर, पक्ष नेते अजित जगताप,औदुंबर वाडदेकर, लतीफ तांबोळी,रामेश्वर मासाळ, बसवराज पाटील महादेव लुगडे तानाजी कांबळे भारत बेदरे भारत पाटील, शिवाजीराव नागणे सुरेश पवार, राजेंद्र पाटील, दिगंबर भाकरे, प्रवीण खवतोडे प्रकाश काळुंगे आदी उपस्थित होते

यावेळी बोलताना भगीरथ भालके म्हणाले मंगळवेढ्यातील शेतकऱ्याचे आर्थिक केंद्रबिंदू असणारा दामाजी सुस्थितीत राहावा यासाठी समविचारीचा प्रयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी केला होता तोच प्रयोग इतर ठिकाणी यशस्वी होत असून भविष्यात देखील समविचारी कायम राहावी यासाठी प्रयत्न राहणार आहेत

यावेळी प्रा शिवाजीराव काळुंगे म्हणाले समाज नेहमी चांगल्या लोकांच्या पाठीमागे उभा राहत असतो फटेवाडी ग्रामस्थांनी बिनविरोधचा मार्ग निवडून गावच्या विकासाला हातभार लावला असून पुढील पाच वर्षात चांगली विकास कामे करावी असे आवाहन केले यावेळी दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील, प्रणव परिचारक, लतिफभाई तांबोळी, अजित जगताप यांनी ही विचार व्यक्त केले

 

रोहन परिचारक बोलताना म्हणाले दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत मंगळवेढेकरांच्या आग्रहामुळे समविचारीचा प्रयोग ध्यानीमनी नसताना यशस्वी झाला त्याच समविचारी आघाडीने ग्रामपंचायत निवडणुकी त करिष्मा करून आगामी राजकारणाची दिशा बदलली असल्याने समविचारी पुढील काळात टिकून राहील

          यावेळी जकरायाचे एम डी सचिन जाधव, चंद्रकांत पडवळे कन्हैया हजारे, प्रभाकर कलूबरमे, सुनील डोके, सुनील पाटील, प्रशांत चव्हाण, जना कोंडुभैरी, बाळासाहेब चव्हाण, रावसाहेब पाटील, रवींद्र पुजारी, सिद्धेश्वर कोकरे, पप्पू स्वामी, संदीप इंगोले एड किरण पडवळे ,दिनेश लुगडे, माजी सरपंच भीमराव चव्हाण, शिवाजीराव आवताडे ,संभाजी इंगोले, सिद्राम शिंदे, दगडू फटे, किसन फटे, दत्तात्रय फटे ,दिगंबर शिंदे,संजय फटे यांच्यासह धनश्री परीवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार सरपंच सीमा काळुंगे यांनी केले यावेळी प्रकाश काळुंगे यांनी स्नेहभोजन व सत्कार समारंभाचे केलेल्या नेटक्या नियोजनाचे कौतुक उपस्थितांनी केले

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More