Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा महसूल प्रशासनाचा दणका, मंगळवेढ्यात 16 खडी क्रशर बंद

विविध परवानग्या नसतानाही चालू केले खडी क्रशर

2,017

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी
              मंगळवेढा तालुक्यात महसूल विभागाच्या अर्थपूर्ण सहकार्याने विविध परवानग्या न घेता सुरू असलेले बेकायदेशीर 16 खडी क्रशर जिल्हा महसूल प्रशासनाने गेल्या दोन दिवसापासून येथील बंद केल्याने खडी क्रेशर चालकातून खळबळ उडाली आहे क्रशर सुरू ठेवण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या नसताना गेली अनेक वर्षे खडीक्रशर चालकांना अभय देणाऱ्या महसूल मधील भ्रष्ट धेंडांची चौकशी करण्याची मागणी होत आहे
मंगळवेढा तालुक्यातील येळगी हुलजंती, लोणार, बोराळे, मंगळवेढा या भागात सुमारे 16 खडी क्रशर आहेत खडी क्रशर काढण्यासाठी ग्रामपंचायत ना हरकत सार्वजनिक बांधकाम विभाग परवानगी आरोग्य विभाग महावितरण कंपनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रदूषण महामंडळ उद्योग विभाग यासह विविध परवानग्यांची गरज असते तसेच जिथे खाडी क्रशर करायचा आहे तेथील जमीन एन ए करून घ्यावी लागते तसेच खडीक्रशर चालू केल्यानंतर उत्पादित मालासाठी स्टॉक लायसन ठेवावे लागते परंतु मंगळवेढा तालुक्यात या परवानग्याकडे अनेक खडी क्रशर चालकानी दुर्लक्ष करत महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपला व्यवसाय गेल्या अनेक दिवसापासून थाटला आहे गौण खनिजातून लाखोंचा मलिदा गोळा केला आहे खडी क्रशर चालकाने वेळेवर रॉयल्टी भरणे आवश्यक असताना देखील येथील अनेक खडी क्रशर चालकांनी ज्यादा माल उत्पादित करून नॉमिनल रॉयल्टी भरल्याचे दाखवले आहे रॉयल्टी न भरल्यामुळे यापूर्वी अनेक खडी क्रशर चालकांना लाखो रुपयांचा दंड करण्यात आला होता परंतु हा दंड न भरल्यामुळे संबंधित खडी चालकाच्या सातबारा उताऱ्या वरती लाखोंचा बोजा चढविण्यात आला आहे परंतु काही जणांनी तडजोडी करून या दंडाला फाटा दिला आहे सध्या येथील महसूल विभागाकडून खडी क्रशरला परवानगी नसताना देखील संबंधित खडी क्रशर चालकांकडून नॉमिनल रॉयल्टी भरून नियमित केले जात आहे तसेच काही जणांकडून वार्षिक सहाशे रुपये ब्रास प्रमाणे पाचशे ब्रास ची रॉयल्टी एकदाच भरून घेतली जाते तीही वेळेवर भरली जात नाही अनेक खडी क्रशर चालकांकडे स्टॉक बुक रजिस्टर नसल्याने व महसूल विभाग वेळोवेळी उत्पादित मालाची तपासणी करत नसल्यामुळे खडी क्रशर चालक रॉयल्टी चुकवुन शासनाला लाखो रुपयांचा चुना लावत आहेत याकडे महसुल विभाग दुर्लक्ष करीत आहे

जिल्हा अधिकाऱयांच्या आदेशाने खडी क्रशर साठी जमिनी एन ए केल्या नाहीत ज्यांनी स्टॉक लायसन काढल्या नाहीत त्यांचे खडी क्रशर बंद आहेत सर्व परवानग्या असणारे खडी क्रशर चालू राहतील
—–स्वप्नील तावडे ,तहसीलदार मंगळवेढा

सध्या येथील अनेक खडी क्रशर चालकांकडे एन ए ची परवानगी नाही स्टॉक लायसन काढून घेतले नसल्याने जिल्हा महसूल प्रशासनाने गेल्या दोन दिवसापासून तालुक्यातील 16 खडी क्रशर बंद केले आहेत येथील किती खडी क्रशर चालकांकडे कोणत्या परवानग्या आहेत याची येथील महसूल विभागाच्या माहिती असून देखील या बाबीकडे दुर्लक्ष करून त्यांना सहकार्य करण्याची भूमिका येथील अधिकाऱ्यांनी केलेली आहे यामागचे गौडबंगाल जाणून घेऊन राज्य शासनाने कारवाई करणे गरजेचे आहे चालू वर्षी तालुक्याला गौणखनिज म्हसुलाचे साडे अकरा कोटीचे उद्दिष्ट असून गेल्या नऊ महिन्यात केवळ 1कोटी महसूल जमा झाला असून उर्वरित तीन महिन्यात साडेदहा कोटींचा महसूल गोळा करायचा आहे तसेच सन 21-22 मध्ये वाळू ,मुरूम व मातीची चोरटी वाहतूक व विक्री करणाऱ्या 126 लोकांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यांनी दंड न भरल्याने त्यांच्या उताऱ्यावर सुमारे 22 कोटींचा बोजा चढवला आहे खडी क्रशर बंद झाल्याने सर्व खडी क्रशर चालकांची एक बैठक सर्व परवानग्या घेण्याच्या सूचना महसूल विभागाने दिल्याचे समजते तसेच ज्यांना खडी क्रशर शासन नियमाप्रमाणे चालवणे जमणार नाही त्यांनी खडी क्रशर कायमचे बंद करावे असेही सांगीतल्याचे समजते

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More