Take a fresh look at your lifestyle.

मंगळवेढा नगरपरिषदेला शिंदे सरकारकडून विकास कामासाठी 3.98 कोटी मंजूर – प्रतीक किल्लेदार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संतभूमीला नववर्षाची भेट, बाळासाहेबांची शिवसेना पक्ष शहर प्रमुखांच्या पाठपुराव्याला यश

232

- Advertisement -

मंगळवेढा  प्रतिनिधी
        मंगळवेढा शहरातील विविध विकास कामासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे मागणी केल्यानुसार मंगळवेढा शहरातील रस्ते व गटार या कामाकरिता 3.98 कोटी मंजूर झाल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख प्रतिक किल्लेदार यांनी दिली
मंगळवेढा शहरातील सांगोला नाका ते बोराळे नाका येथे रस्ते व गटार करणे 2कोटी25 लाख, हजारे गल्ली ते प्रवीण हजारे रस्ता डांबरीकरण करणे 22 लाख, गजानन उन्हाळे घर ते केशव पडवळे घर रस्ता काँक्रिटीकरण करण करणे 10 लाख,
दिगंबर यादव ते सांगोला रस्ता 20 लाख,
चंद्रकांत पवार घर ते प्रकाश नलवडे घर समोर रस्ता करणे सुरवसे बोळ ते मुख्य रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व गटार करणे 19 लाख, अशोक लेंडवे घर ते बळीराजा बँक काँक्रिटीकरण करणे 10 लाख, बबन चव्हाण घर ते सांगोला रोड गटार बांधणे 16 लाख, कल्याण प्रभू ते नागणेवाडी नगरपालिका हद्द रस्ता 24 लाख, चोखामेळा चौक ते मुरलीधर चौक रस्ता डांबरीकरण करणे 12 लाख, ढाणे घर ते महादेव मंदिर रस्ता व गटार 10 लाख, टीकाचार्य मंदिर ते लोकमंगल सभागृह बोळ काँक्रीट करण करणे समाधान हेंबाडे घर ते लक्ष्मण सावंजी घर 10लाख वरील सर्व कामे मंजूर झाली आहेत.   लवकरात लवकर सर्व कामांच्या निविदा प्रसिद्धी करून सर्व कामे चांगल्या दर्जाचे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत सदर निधी मंजूर करण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेच्या हिताचे असून आगामी काळात मंगळवेढा  तालुका व शहर विकासाच्या कामांना  निधी ची कमतरता पडणार नाही सरकारच्या माध्यमातून विकासाची गंगा तालुक्यात आणणार आहे 

प्रतीक किल्लेदार,शहराध्यक्ष

बाळासाहेबांची शिवसेना पक्ष

 

 

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More