नववर्षात मंगळवेढा पोलीसांकडून अवैध वाळूचा उपसा करणारा 25 लाखाचा जेसीबी जप्त,दोघविरोधात गुन्हा दाखल
महसूल विभाग अवैध वाळूचोरीबाबत स्लिपिंग मोडवर तर पोलीस खाते ऍक्शन मोडवर
मंगळवेढा प्रतिनिधी
तांडोर ता. मंगळवेढा येथील भिमा नदीच्या पात्रातून अवैध्यरित्या वाळू उपसा चालू असताना मंगळवेढा पोलिसांनी कारवाई करून वाळूचा उपसा करणारा सूमारे 25 लाख रु किमतीचा जेसीबी जप्त करून अज्ञात चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की
पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण
शिरीष सरदेशपांडे
यांनी अवैध धंदयावर कारवाई करणेबाबतचे आदेश दिलेले असून संबंधीत अवैध व्यवसाय करणा-यांचे समुळ उच्चाटन करणेबाबत सुचना दिलेले आहेत. त्यानुसार पोलिसांना
दि31 रोजी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना तांडोर ता. मंगळवेढा येथील भिमा नदीच्या पात्रातून अवैध्यरित्या वाळू उपसा चालू असले बाबत गोपनीय माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी मंगळवेढा पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक रणजीत माने, सपोनि आवटे, सपोनि बामणे, पोसई शेटे यांचेसह पोलीस ठाणेकडील सरकारी वाहनाने दोन टिम तयार करून सदर ठिकाणी रात्री तांडोर येथे रात्री सव्वा अकरा वा. च्या सुमारास कारवाई साठी भिमा नदीच्या पात्रालगत पोहचल
गेल्या अनेक दिवसापासून येथील भीमा नदीतून महसूल विभागाच्या दुर्लक्षतेमुळे वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत असताना येथील तलाठी व मंडल अधिकारी आपले हात ओले करून घेत आहेत त्यामुळे शासनाचे मात्र मोठे नुकसान होत असून याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे
त्यावेळी भिमा नदीच्या पात्रात काही वाहने व जेसीबी वाळूचा उपसा करीत असलेले दिसले त्यावेळी पोलिसांना बघताच काही वाहने पळून गेली त्याच वेळी एक पिवळया रंगाचा जेसीबी अवैधरित्या वाळू भरणेकरीता आला असल्याचे दिसल्याने पोलिस त्याला पकडण्यास पळत गेले असता जेसीबी चालकांनी जेसीबी नदी पात्रातून बाहेर करून नदी पात्रा लगत असलेल्या शेतातून जेसीबी पळवू लागला जेसीबीच्या पाठीमागे पळत जावून सुमारे दिड ते दोन कि.मी अंतरावर गेल्यानंतर कॅनॉलच्या शेजारी काळया रानाच्या चिकलात अडकला व सदर जेसीबीवरील अज्ञात चालकाने पोलीस आपल्या जवळ पळत येत आहेत हे पाहून जेसीबी जागीच सोडून त्या ठिकाणाहून पळून गेला आहे. त्यावेळी सुमारे 25 लाख किमतीचा एक पिवळया रंगाचा महिद्रा अर्थ मास्टर कंपनीचा जेसीबी त्यास आरटिओ नंबर नसलेला त्याचा चेसीस नंबर MDZAAZEEHH6F49728 असलेला जेसीबी ताब्यात घेवून मंगळवेढा पोलीस ठाणेस आणून जप्त करण्यात आलेला आहे.
सदर मुददेमालाचा पंचनामा करण्यात आलेला असून सदर जेसीबी वाहनाचा चालक व मालक या दोघांविरूध्द मंगळवेढा पोलीस ठान्यात सोमनाथ बबन माने यांनी गुन्हा दाखल केलेला असून सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ कोळी हे करीत आहेत.
सदर कारवाई शिरीष सरदेशपांडे पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण,अप्पर पोलीस अधिक्षक हिंम्मतराव जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांचे मार्गदर्शनाखाली रणजीत माने व त्याचे पथकातील सपोनि आवटे, सपोनि बामणे, पोसई शेटे, पोसई धापटे यांच्या सह सहकाऱ्यांनी सदरची कारवाई केलेली आहे.

