Take a fresh look at your lifestyle.

येड्राव येथे तलवारीने हल्ला, तिघांविरूध्द गुन्हा दाखल

1,270

- Advertisement -

मंगळवेढा  प्रतिनिधी

येड्राव ता मंगळवेढा येथील आश्रम शाळेच्या आवारात लघुशंकेला बसल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवारीने हल्ला केल्याप्रकरणी अषिश संभाजी काळे,नम्रता आशिष काळे,सखुबाई संभाजी काळे या तीघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी कुमार राक्षे यांचे आरोपी आशिष काळे याचेबरोबर पैशाच्या कारणावरून पाठीमागे भांडण झाले होते. तेव्हापासून राग मनात धरून आरोपी हा शिवीगाळी,दमदाटी करीत होता.दि.1 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वा. फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ आश्रमशाळेच्या आवारात लघुशंकेसाठी गेले होते. आरोपीने त्या ठिकाणी हातात काठी घेवून येवून तु लघुशंकेला येथे का बसला अशी विचारणा करीत शिवीगाळ करू लागला.
यावेळी फिर्यादीने तु भांडण का करीत आहे अशी विचारणा केली असता हातातील काठीने पाठीत,डोकीत दोघांना मारहाण केली.
आरोपीने फिर्यादीच्या मामाच्या घरी घुसून टी.व्हि.कपाट,फ्रिज यांची मोडतोड करून भांडी जमिनीवर आपटून फिर्यादीची मावशी शोभा वाघमारे,मंगल क्षिरसागर यांचेवर तलवारीने जीवे मारण्याच्या उद्देशाने हाता,कानावर,डोक्यावर वार करून गंभीर जखमी केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More