झेप परिवाराचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार ‘पुण्यनगरी’ चे संभाजी नागणे यांना जाहीर
झेप सन्मान सोहळा 2023: मान्यवरांच्या हस्ते होणार गौरव
मंगळवेढा प्रतिनिधी
समाज उन्नतीसाठी सतत कार्यरत राहत ज्ञानाधिष्ठित समाज घडवीत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी बहुमोल योगदान देणाऱ्या मान्यवरांना झेप सन्मान सोहळ्यात गौरवण्यात येते. यावर्षीच्या झेप सन्मान सोहळा 2023 मध्ये सन्मानित होणाऱ्या मान्यवरांच्या नावांची घोषणा झेप परिवाराच्यावतीने झेप सन्मान सोहळ्याचे समन्वयक प्रा.बसवराज पाटील यांनी केली.
पुरस्कार पुढीलप्रमाणे
झेप आदर्श संस्था पुरस्कार- महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा-दामाजी नगर), धन्वंतरी पुरस्कार- आरोग्यवर्धिनी केंद्र, मरवडे(सोलापूर जिल्ह्यात एक अग्रेसर प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून नावलौकिक)
हिरकणी पुरस्कार- .कमल उर्फ सुनंदा कुंडलिक खांडेकर (बावची, श्रीकांत खांडेकर- आयएएस अधिकारी 2020 यांच्या मातोश्री), आदर्श पत्रकारिता पुरस्कार- संभाजी शिवाजी नागणे (जेष्ठ पत्रकार, माजी अध्यक्ष, मंगळवेढा तालुका पत्रकार संघ), आदर्श शाळा पुरस्कार- नूतन हायस्कूल, बोराळे), सेवावृत्ती पुरस्कार-नारायण हणमंत माने (सेवानिवृत्त सहाय्यक लेखापाल, दामाजी शुगर, विविध क्षेत्रात समाजपयोगी काम), स्वामी विवेकानंद आदर्श शिक्षक पुरस्कार- विशाल विलास गायकवाड (प्राथमिक विभाग, सहशिक्षक,नगरपालिका शाळा नं.5, मंगळवेढा), क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार- सौ.इंदिरा विठ्ठल थोरात-चौधरी ( माध्यमिक विभाग, सहशिक्षिका, शरद पवार विद्यालय, शरदनगर- मल्लेवाडी), झेप उत्कृष्ट निवेदक पुरस्कार- दिलीप एकनाथ बिनवडे, (ब्रह्मपुरी, निवदेन क्षेत्रात गेल्या 40 वर्षापासून आपल्या कामाचा ठसा), गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार-सुखदेव हरीबा पवार (सेवक, माध्यमिक आश्रम प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, बालाजीनगर) या व्यक्ती व संस्थांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
दि.01 जानेवारी 2019 पासून समाज उन्नतीसाठी एकत्रित आलेल्या झेप परिवाराच्यावतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मंडळींना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्याबाबत झेप परिवाराचे मार्गदर्शक भारत घुले, प्रा.शिवलाल जाधव, उत्तमसिंग रजपूत, संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मेलगे, सचिव प्रा. मल्लेशा अरकेरी, प्रा.संतोष आसबे, प्रा.पुंडलिक पवार, सचिन घुले, विश्वजित साठे, प्रा.अनुजा चौगुले, अश्विनी मेलगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
पुरस्कारप्राप्त व्यक्ती व संस्थांना याच महिन्यात होणाऱ्या झेप सन्मान सोहळा 2023 मध्ये सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, मानाचा फेटा व एक पुस्तक तसेच रोपटे देऊन गौरवण्यात येणार आहे.
या अगोदर झेप लालसिंग रजपूत- व्यक्ती नव्हे चळवळ पुरस्कार- राहुल शहा यांना जाहीर करण्यात आलेला आहे.


अभिनंदन दाजी
Thanks