भीमा नदीकाठच्या गावांचा वीजपुरवठा सुरळीत होणार- आ समाधान आवताडे
नदीत पाणी असून ही विजेअभावी पिकांचे नुकसान
मंगळवेढा प्रतिनिधी
उजनी धरणातून सध्या सोलापूरला पिण्यासाठी भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले असून पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचेपर्यंत नदीकाठच्या गावचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच नदीतील पाणी सध्या हिळळी बंधाऱ्यात पोहोचले असून तात्काळ मंगळवेढा पंढरपूर भागातील भीमा नदीकाठचा वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी सूचना आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिल्या आहेत.जिल्हाधिकरी कुमार आशीर्वाद यांनी दिनांक 25 मार्च पासून नदीकाठावरील वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश दिल्याची महिती आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.
सध्या नदीत पाणी असूनही वीज पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते,शेतात असलेली उभी पिके डोळ्यासमोर वीज नसल्याने जळून चालली होती,केवळ दोनच तास वीज पुरवठा सुरू असल्यामुळे शेतात पाणी येण्याअगोदर वीज बंद होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते,त्यामुळे नदीकाठचे शेतकरी वीज पुरवठा सुरळीत करण्या संदर्भात वारंवार मागणी करत होते त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना बोलून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे आज सोमवार दिनांक 25मार्च सायंकाळपासून वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याचे आ समाधान आवताडे यांनी सांगितले.

