Take a fresh look at your lifestyle.

दामाजीकडून गुढी पाडव्याची सभासदांची सवलतीच्या दरातील 25 किलो साखर वाटप सुरु -चेअरमन शिवानंद पाटील

26मार्च ते 29मार्च दरम्यान 33केंद्रातून होणार साखर वाटप

548

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

  श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याकडून सभासदांना गुढीपाडवा सणाचे निमित्ताने दिली जाणारी20 रुपये या सवलतीचे दराने 25किलो दिली जाणारी साखर विक्री दि26मार्च ते 29मार्च या कालावधीत 33केंद्रावरुन देण्याची व्यवस्था करणेत आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.

       तालुक्यातील कारखाना साईट, मंगळवेढा नागणेवाडी आùफीस, खोमनाळ नाका, ब्रम्हपूरी, माचणूर, बोराले, सिध्द्ापूर, अरळी, डोणज,नंदुर,मरवडे,हुलजंती,भोसे,रड्डे,नंदेश्वर,हुन्नूर,लोणार, पाटखळ, शिरसी,आंधळगांव, लक्ष्मी दहिवडी, मारापूर, मल्लेवाडी,सलगर बु, मारोळी, निंबोणी तळसंगी , गोणेवाडी, शिरनांदगी, चिक्कलगी,लें.चिंचाळे ,लवंगी, महमदाबाद (हू) इत्यादी केंद्रावर सभासदांचे सोईनुसार साखर वाटप करण्यात येत आहे.तसेच संबंधीत केंद्रावर कारखान्याने ठरवून दिलेल्या वेळेत उचल न केलेल्या सभासदांची साखर कारखाना साईटवर सुट्टीचे दिवस सोडून दर शुक्रवारी सकाळी 10ते 5 या वेळेत डिसेंबर24 अखेरपर्यंत वाटप केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

             कारखान्याचे अपूर्ण शेअर्स, ऊस बिल अùडव्हान्स येणे, बेणे अडव्हान्स येणे, बेसल डोस येणे, ऊस तोडणी वाहतूक येणे तसेच अन्य प्रकारची कारखान्याची येणेबाकी ज्या सभासदांकडे आहे अशा सभासदांची साखर शासनाच्या धोरणानुसार देता येणार नसलेची माहिती प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी दिली.सभासद बंधुनी कारखान्याने ठरवुन दिलेल्या साखर विक्री केंद्रावर आपले साखर कार्ड नोंद करुन वेळेत साखर घेवून जाणेचे आवाहन व्हाईस चेअरमन तानाजीभाऊ खरात यांनी केले आहे.

           सदर प्रसंगी संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणूकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय उपस्थि्त होते.

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More