Take a fresh look at your lifestyle.

रक्ताचे पाणी करेन पण जनतेला दिलेली वचने पूर्णच करेन -आ.समाधान आवताडे

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीनंतर ग्रामस्थांनी केला आ. आवताडे यांचा जंगी सत्कार

517

- Advertisement -

 

मंगळवेढा प्रतिनिधी

 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील जनतेने मतदार संघातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मतदानरुपी दिलेल्या आशीर्वादाला व संधीला सोने समजून पाणी योजना व इतर विकास कामे करण्यासाठी माझ्या रक्ताचे पाणी करेन पण जनतेला दिलेली वचने पूर्णच करेल.तालुक्यातील २४ गावे उपसा सिंचन योजनेची मंजुरी घेऊन पात्र ठरलो हे माझे परमभाग्य असल्याचे भावनिक उद्गगार मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी काढले.

        आमदार समाधान आवताडे यांच्या अथक प्रयत्नांतून अंतिम मंजुरी मिळालेल्या उपसा सिंचन योजनेतील समाविष्ट गावांच्या ग्रामस्थांनी व मतदार संघातील जनतेने आमदार आवताडे यांचा कृतज्ञता सत्कार आयोजित केला होता त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना आमदार आवताडे हे बोलत होते.

              पुढे बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की, राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेला अंतिम मंजूरी मिळाल्यानंतर काही राजकीय मंडळींनी भविष्यकाळात येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या योजनेचे श्रेय घेण्यासाठी अक्षरश: स्पर्धा सुरू केली आहे. परंतु आपण कोणतीही राजकीय अभिलाषा अथवा स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता केवळ या भागातील जनतेला पाणी मिळाले पाहिजे हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून माझ्या आमदारकीच्या काळामध्ये प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्यामध्ये मला सफलता प्राप्त झाली. त्यामुळे यापुढील काळामध्ये ही आपण कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता मतदार संघातील विविध पाणी योजना व इतर विकास कामे करण्यासाठी माझ्या रक्ताचे पाणी करेन पण जनतेला दिलेली वचने पूर्णच करेल असा ठाम विश्वास आमदार आवताडे यांनी व्यक्त केला. 

            या कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक करताना भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांनी सांगितले की, विविध विकास कामांच्या रूपाने गेल्या अनेक वर्षांचा मतदार संघाचा निधीचा वनवास संपुष्टात आणणाऱ्या आमदार समाधान आवताडे यांचे या योजनेसाठी असणारे योगदान पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या विकासात्मक इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवले जाईल. दुष्काळी भागातील जनतेचा संवेदनशील मनाने विचार करून त्यांच्यासाठी अहोरात्र झटून त्यांच्या जीवनामध्ये राजयोग निर्माण करणाऱ्या आमदार आवताडे यांची कामगिरी मतदार संघातील जनता कदापि विसरणार नाही असे त्यांनी सांगितले.

         यावेळी तनाळी मठाचे मठाधिपती ह.भ.प.दाजी महाराज, विजयसिंह देशमुख, दत्तात्रय जमदाडे, दामाजी शुगर संचालक अशोक केदार, चेअरमन नीला आटकळे, माजी सरपंच मरगु कोळेकर, सरपंच अनिल पाटील, सुरेश कांबळे,प्रसाद कळसे व व इतर नागरिकांनी यावेली गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या उपसा सिंचन योजनेसाठी आमदार समाधान आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून वेळोवेळी अविरतपणे प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावल्याने या भागातील जनतेचे भाग्य उजळले आहे. आमदार आवताडे यांनी केलेल्या अविस्मरणीय कार्यामुळे मंगळवेढा तालुक्याचे लवकरच नंदनवन होण्यास प्रारंभ होईल असा विश्वासही यावेळी उपस्थित जनतेने व नागरिकांनी व्यक्त केला आहे.

         या कार्यक्रमासाठी विविध गावांचे सरपंच, उपसरपंच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य नागरिक, शेतकरी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Whatsapp Group Join

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More